पातोंडा – अमळगाव व जळोद – खवशी या रस्त्यांचे डांबरीकरण तसेच खवशी येथे सामाजिक सभागृह बांधकाम साठीची मागणी. जि.प.सदस्या मिनाताई पाटील यांच्या शेष फंडातून तूर्त नांद्री – खौशी २.५ किलोमीटर डांबरीकरण मंजूर.

अमळनेर : तालुक्यातील मेहेरगाव येथे स्वच्छ भारत अभियानांतर्गत हागनदारीमुक्त गाव उत्साह कार्यक्रम जळगाव लोकसभेचे खासदार उन्मेष दादा पाटील यांचे उपस्थितीत नुकताच पार पडला. यावेळी खवशी ग्रामस्थांतर्फे त्यांना पातोंडा – अमळगाव व जळोद – खवशी या रस्त्यांचे डांबरीकरण तसेच खवशी येथे सामाजिक सभागृह बांधकाम मागणीचे निवेदन देण्यात आले. याप्रसंगी खवशी येथील विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन रोहिदास कापडे, माजी चेअरमन कैलास पाटील, सदस्य आनंदा कापडे, धनराज पवार, भरत सूर्यवंशी, सचिन कापडे आदी उपस्थित होते.
निवेदन दिल्यानंतर, खासदार यांनी तातडीने दखल घेतली आहे. निवेदनानुसार पातोंडा – अमळगाव रस्त्यावर तूर्त नांद्री – खौशी या २.५ किलोमीटर अंतरावर पातोंडा- अमळगाव गटाच्या जिल्हा परिषद सदस्या मिनाताई पाटील यांच्या शेष फंडातून डांबरीकरण मंजूर झाले असूून लवकरच कामाच्या निविदा निघणार आहेेत. खवशी ग्रामस्थांतर्फे खा.उन्मेष दादा पाटील आणि जि.प.सदस्या मीनाताई पाटील यांचेप्रती आभार मानले आहेत.