दयाराम पाटील यांचे अल्पशा आजाराने निधन

अमळनेर : तालुक्यातील तरवाडे येथील (ह.मु. माधव नगर, अमळनेर) रहिवासी तथा माध्यमिक शाळेचे निवृत्त मुख्याध्यापक दयाराम विठ्ठल पाटील यांचे आज दुपारी तीन वाजता अल्पशा आजाराने निधन झाले. मृत्यूसमयी ते ७४ वर्षांचे होते. त्यांची अंत्ययात्रा उद्या (ता.६) सकाळी अमळनेर येथील ढेकू सिम रोडवरील माधव नगर येथील राहत्या घरापासून निघणार आहे. त्यांचे पश्चात पत्नी, चार मुले, सुना, नातवंडे, तीन भाऊ असा परिवार आहे. ते जय योगेश्वर विद्यालयाचे उपप्राचार्य अनिल पाटील, सुनिल पाटील, दिपक पाटील, माध्यमिक शिक्षक प्रविण पाटील यांचे वडील तर प्रा.आर.व्ही.पाटील यांचे जेष्ठ बंधू होत.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!