पन्नास वर्षांनंतर तीन दिवसीय धार्मिक कार्यक्रमाने पाचपावली देवी मंदिरात जिर्णोद्धार, भाविक समाधानी

प.पू. प्रसाद महाराजांच्या हस्ते मंदिरावर पूजा व ध्वजारोहण

अमळनेर : सुरू असलेल्या शहरातील पोलीस लाईनमधील पाचपावली देवी मंदिरात शुक्रवारी नवीन राजस्थान येथून आणलेल्या मुर्त्यांची स्थापना करण्यात आली. या मंदिराचा ५० वर्षांनंतर जिर्णोद्धार झाला आहे. शहरातील प्रसिद्ध उद्योगपती आर. के.पटेल ग्रुपचे मालक राजधर काळू पाटील यांनी १९७० मध्ये मुर्त्या देऊन मंदिरात त्या मूर्त्यांची स्थापना केली होती. आर. के. ग्रुपने पुढाकार घेत पुन्हा एकदा मंदिरात ५० वर्षांनंतर खंडित झालेल्या मुर्त्या काढून त्या जागी जयपूर राजस्थान येथून आणलेल्या नवीन मुर्त्यांची स्थापना केली. तीन दिवस मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम सुरू होते. जीर्णोद्धार पूजेत पोलीस निरीक्षक अंबादास मोरे, मितेश पाटील, प्रसाद झारे, महेश कुलकर्णी यांचा सपत्नीक सहभाग होता. यावेळी संत सखाराम महाराज संस्थानचे गादीपती प्रसाद महाराज यांच्या हस्ते पूजा व मंदिरावर ध्वजारोहण करण्यात आले.

यावेळी माजी आमदार साहेबराव पाटील, नगराध्यक्षा सौ.पुष्पलता पाटील, डीवायएसपी राजेंद्र ससाणे, पोलीस निरीक्षक अंबादास मोरे, उद्योगपती विनोदभैय्या पाटील, उद्योगपती वसंत पाटील, उद्योगपती प्रवीण पाटील, प्रदीप अग्रवाल, योगेश मुंदडा, जितेंद्र जैन, पंकज मुंदडा, डिगंबर महाले, सुहास राणे, मुकुंद विसपुते, विवेक देशमुख, महेश कोठावदे, सुनिल चौधरी, भास्कर बोरसे, किरण पाटील, मनोज पाटील, डॉ.विजय पवार, रमेश जीवनानी, प्रविण जैन, सौ.ज्योती मोरे, लिना पाटील, मंगला पाटील, राजश्री पाटील, मोनाली पाटील, दिव्या जीवनानी यांचेसह असंख्य भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सायंकाळी महाआरती नंतर भक्तांना तिर्थप्रसादाचे वाटप करण्यात आले.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!