पातोंडा, दहिवद, गांधली, पिंपळी व देवळी माळी महासंघ संत सावता गौरव पुरस्काराने सन्मानित

रविवार १२ एप्रिल रोजी महात्मा ज्योतिबा फुले सभागृह अमळनेर येथे पुरस्कार वितरण करण्यात येणार


पातोंडा ता.अमळनेर : धार्मिक, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत सावता प्रबोधन विकास संस्था व क्रांतीसुर्य महात्मा फुले विचार मंच तर्फे पातोंडा येथील महाराष्ट्र माळी समाज महासंघ , दहिवद येथील माळी समाज पंचमंडळ (फुलमाळी व काचमाळी), देवगाव देवळी येथील महाराष्ट्र माळी महासंघ व संत सावता माळी मित्र मंडळ, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले महिला मंडळ, संत सावता नवयुवक मंडळ गांधली, संत सावता माळी मित्र मंडळ पिंपळी यांना तालुकास्तरीय पुरस्काराने स्मृतीचिन्ह व विशेष प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.

” संत सावता महाराजांच्या प्रेरणेने माळी समाजाचा गौरव वाढविणा-या माळी समाज पंचमंडळांचा सन्मान केल्यास ते जोमाने समाजसेवेचा वसा अविरत सुरू ठेवतील.” असे मत सावता प्रेरणा प्रबोधन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रविण बी महाजन यांनी व्यक्त केले. पातोंडा येेेथील माळी महासंंघाचे अध्यक्ष बंटीभाऊ बोरसे यांनी हा पुरस्कार सामाजिक शैक्षणिक व धार्मिक क्षेत्रात कार्य करण्याचे मनोबल वाढविणारा असून समाजातील आबालवृद्ध यांना सामजिक कार्यात अग्रेसर रहाण्याची प्रेरणा देणारा आहे.” असे मत व्यक्त केले.

सदर पुरस्काराकरीता कोणतेही प्रस्ताव मागविण्यात आले नसून  सावता प्रेरणा प्रबोधन संस्था व क्रांतीसुर्य महात्मा फुले विचार मंच यांनी प्रत्यक्ष चौकशी करून व सदर माळी पंच मंडळांनी केलेल्या कामाची प्रत्यक्ष पडताळणी करून त्यांना पुरस्कार जाहीर केले आहेत. महात्मा फुले जयंती सप्ताह निमीत्त रविवार १२ एप्रिल रोजी महात्मा ज्योतिबा फुले सभागृह क्षत्रिय फुलमाळी समाज संस्था अमळनेर येथे विभागीय, जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय पुरस्कार वितरण समारंभात सदर पुरस्कार देण्यात येणार आहेत. सदर पुरस्कार जाहीर झाल्यानंतर पातोंडा, दहिवद व देवगाव देवळी येथील माळी समाजात जल्लोषाचे वातावरण आहे.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!