प्रधानमंत्री कृषी कौशल्य विकास योजने अंतर्गत प्रशिक्षणातील उत्तीर्ण महिलांना प्रमाणपत्राचे वाटप व सन्मान

अमळनेर : तालुक्यातील पातोंडा येथेेे महिला दिनानिमित्त काल (ता.८) रोजी प्रधानमंत्री कृषी कौशल्य विकास योजने अंतर्गत प्रशिक्षणातील उत्तीर्ण महिलांना ग्रामपंचायत पातोंडा येथे प्रमाणपत्र वाटप करून त्यांचा सन्मान करण्यात आला. नोव्हेंबर २०१९ ते फेब्रुवारी २०२० दरम्यान प्रधानमंत्री कृषी कौशल्य विकास योजने अंतर्गत पातोंडा मंडळातील पातोंडा, दहिवद खुर्द, टाकरखेडा येथील २०० शेतकरी पुरूष व महिलांना प्रशिक्षण दिले होते. या सर्व प्रशिक्षणार्थींची जानेवारी महिन्यात परीक्षा घेण्यात आली त्यापैकी १८७ प्रशिक्षणार्थी उत्तीर्ण झाले. यापैकी ५० प्रशिक्षणार्थी महिला उत्तीर्ण झाल्या. महिला दिनानिमीत्त या सर्व उत्तीर्ण महिलांना कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच प्रतिनिधी किशोर मोरे यांच्या हस्ते प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.

यात, प्रत्येक उत्तीर्ण प्रशिक्षणार्थीस दि.१८.०२.२०२० ते १८.०२.२०२३ या कालावधी करीता न्यु इंडिया इन्शुरन्स कंपनीचा दोन लाख रूपयाचा अपघात विमा प्रधानमंत्री कृषी कौशल्य विकास योजने अंतर्गत प्रदान करण्यात आला आहे. तसेच प्रत्येक प्रशिक्षणार्थीच्या बॅक खात्यात प्रशिक्षण भत्ता म्हणून पाचशे रूपये जमा करण्यात येणार असल्याची माहिती तालूका समन्वयक धनश्री मिस्तरी यांनी दिली. याप्रसंगी सामाजिक कार्यात सदैव अग्रेसर राहणारे उमेश पाटील सर यांचा सत्कार सौ पूनम बिरारी यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन करण्यात आला. ग्रा.पं. सदस्या व माजी सरपंच शितल महेंद्र पाटील यांनी सुत्रसंचालन केले. या प्रसंगी पूनम बिरारी, ललिता लाड, रंजना बिरारी, आशाबाई लोहार, कविता लोहार, सुनिता लोहार, मनिषा पाटील, सिमा संदानशिव आदी महिला उपस्थित होत्या. यावेळी जेष्ठ पत्रकार एकनाथ लोहार, अमित पवार व भूषण बिरारी यांचाही सत्कार करण्यात आला. उपस्थित सर्व ग्रामस्थ व महिला यांचे आयोजकांनी आभार मानले.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!