अमळनेर : तालुक्यातील खवशी येथील रहिवाशी उमेश रोहिदास कापडे (बापु ) याचे आज ता.९ रोजी दुःखद निधन झाले. मृत्यू समयी त्याचे वय ३४ वर्ष होते. गेल्या काही वर्षांपासून तो नाशिक येथे आयसीआयसीआय बॅकेत नोकरीस होता. मन मिळाऊ स्वभावाचा बापु इतक्या लवकर आपल्या सर्व्याना सोडुन निघुन जाईल अस कधीही वाटले नव्हते. रोहिदास गंगाराम कापडे यांचा तो मुलगा होता. त्याचे पश्चात आई, वडील, पत्नी, मुलगा व लहान भाऊ असा परिवार आहे. परमेश्वर मृतात्म्याला शांती देवो व त्यांच्या परिवारावर जो काही दुःखाचा डोंगर कोसळला आहे ते दुःख पेलण्याची शक्ती देवो, ही खवशी ग्रामस्थांतर्फे भावपुर्ण श्रद्धांजली !