संचारबंदी लागू असतांनाही गर्दी गोळा करणाऱ्या २ व विनाकारण फिरणाऱ्या १६ जणांवर अमळनेर तालुका पोलीस प्रशासनाने केले गुन्हे दाखल

अमळनेर : वारंवार सूचना देऊनही गर्दी गोळा करण्यावरून  दोन जणांवर आपत्ती व्यवस्थापन कायदा आणि महाराष्ट्र कोविड १९ उपाययोजना कायद्यान्वये तर विनाकारण फिरणाऱ्या १६ जणांवर पोलीसांनी शासनाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक अंबादास मोरे , पोलीस नाईक शरद पाटील, सुनील पाटील, योगेश महाजन व आर सी पी प्लातून चे कर्मचारी यांनी शहरात फेरफटका मारला असता, अग्रवाल उपहार गृहाचे मालक हरीश प्रेमचंद अग्रवाल व अग्रवाल डेअरी चे मालक विशाल राजकुमार अग्रवाल यांनी सूचना देऊनही दुकानांवर गर्दी जमवून खाद्य पदार्थ विक्री केल्याप्रकरणी आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ चे कलम ५१ब , महाराष्ट्र कोविड १९ उपाययोजना कायदा २०२० चे कलम ११ प्रमाणे तसेच भादंवि कलम १८८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच संचारबंदी लागू असतानाही विविध ठिकाणी विनाकारण फिरणाऱ्या जगदीश नाना पाटील वय २५ रा.पैलाड शनीपेठ, मुख्तार अब्दुल राज्जाक वय ३८ रा.कसाली मोहल्ला, जहीर अली कमर अली वय ३८ रा.गांधलीपुरा, भगवान पोपट पाटील वय ६५ रा.स्टेट बँकेसमोर, सुरेश सुकलाल चौधरी वय ४४ रा.बंगाली फाईल, कमलेश हरीश जोशी वय २५ रा.शिरूड नाका, आधार उत्तम पाटील वय ४८ रा.पळासदडे, रतीलाल जयराम पाटील ६३ रा.पैलाड, राहुल प्रभाकर पाटील वय २२ रामेश्वर खुर्द, लिलाधर पुंडलिक कुंभार वय ४० रा.पैलाड, राहुल गुलाब चौधरी वय ३६ रा.पातोंडा, रायसिंग पांडुरंग पाटील वय ५२ रा.खोकरपाट, किशोर दिनकर देवरे रा.पातोंडा, शांताराम भालेराव पाटील वय ३१ रा.पातोंडा, नाशिर शेख इकबाल वय ३७ रा.जुना पारधीवाडा, समाधान जिजाबराव पाटील वय ३२ रा.संताजीनगर यांनी शासनाच्या आदेशाचे उल्लंघन केले म्हणून कलम १८८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!