कोरोना जनजागृती साठी इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा

स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कुल चा उपक्रम

अमळनेर : कोरोना व्हायरस मुळे घराघरात मुले बंदिस्त झाली आहेत. त्यांना घरात बसून कौशल्य विकसन व प्रबोधन व्हावे या उद्देशाने स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कुल, अमळनेर तर्फे चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. कोविड -19 (कोरोना) आजाराच्या जनजागृती करीता इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी ही चित्रकला स्पर्धा आहे.

यासाठी विद्यार्थ्याने आपल्या चित्रकला वहीतच खडू (oil pastels )किंवा रंगपेटी (poster colour ) चा वापर करुन आपल्या हाताने चित्र काढावे. काढलेल्या चित्राचा स्पष्ट दिसेल असा फोटो अपलोड करावयाचा आहे. चित्रावर कोपऱ्यात आपले पूर्ण नाव व शाळेचा पत्ता मराठी (देवनागरी) लिपीत अचूक लिहावा. त्यानंतर ९५५२५७८३७६ या नंबरवर हे चित्र पाठवावयाचेे आहे. स्पर्धा निकाल १५ एप्रिल २०२० रोजी राहील. निवडक उत्कृष्ट चित्रांना आकर्षक डिजिटल ई प्रमाणपत्र आपल्या भ्रमणध्वनीवर पाठविले जाणार आहेेत अशी माहिती आयोजकांनी दिली आहे. अधिक माहिती साठी नीरज अग्रवाल ९४२२२७८३८१, दिनेश पालवे ७५८८८१३६६५ यांचेेेशी संपर्क साधावा.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!