अमळनेर : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-२०१९ करीता जिल्ह्यात नामनिर्देशनपत्र दाखल केलेल्या १५४ उमेदवारांपैकी नामनिर्देशनपत्र मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी जिल्ह्यातील ५४ उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत. त्यामुळे आता जिल्ह्यातील अकरा विधानसभा मतदार मतदार संघासाठी एकूण १०० उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात राहिले आहेत. अशी माहिती निवडणूक शाखेमार्फत प्राप्त झाली आहे. माघारीच्या दिवशी जिल्ह्यातील विविध विधानसभा मतदार संघातील स्थिती पुढीलप्रमाणे.. चोपडा येथे एकूण १८ उमेदवार होते पैकी १० उमेदवारांची माघार. रावेर विधानसभा मतदार संघात एकूण १४ उमेदवार होते पैकी ४ उमेदवारांची माघार. भुसावळ विधानसभा मतदार संघात एकूण २१ उमेदवार होते पैकी ९ उमेदवारांची माघार. जळगाव शहर विधानसभा मतदार संघात एकूण २१ उमेदवार होते पैकी ८ उमेदवारांची माघार. जळगाव ग्रामीण विधानसभा मतदार संघात एकूण १५ उमेदवार होते पैकी ४ उमेदवारांची माघार. अमळनेर विधानसभा मतदार संघात एकूण ११ उमेदवार होते पैकी ४ उमेदवारांची माघार. एरंडोल विधानसभा मतदार संघात एकूण ८ उमेदवार होते पैकी कोणत्याही उमेदवारांने माघार घेतलेली नाही. चाळीसगाव विधानसभा मतदार संघात एकूण १३ उमेदवार होते पैकी ५ उमेदवारांची माघार. पाचोरा विधानसभा मतदार संघात एकूण ७ उमेदवार होते पैकी कोणत्याही उमेदवारांने माघार घेतलेली नाही. जामनेर येथे एकूण १४ उमेदवार होते पैकी ५ उमेदवारांची माघार. मुक्ताईनगर येथे एकूण १२ उमेदवार होते पैकी ५ उमेदवारांची माघार.
अर्ज माघारीनंतर अमळनेर विधानसभा मतदार संघात निवडणूक रिंगणात असलेल्या उमेदवारांमध्ये (१) अनिल भाईदास पाटील – राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी (घड्याळ) (२) अंकलेश मच्छिंद्र पाटील – महाराष्ट्र नवनिर्माण सेना (रेल्वे इंजिन) (३) रामकृष्ण विजय बनसोडे (भैय्यासाहेब) – बहुजन समाज पार्टी (हत्ती) (४) शिरीषदादा हिरालाल चौधरी – भारतीय जनता पार्टी (कमळ) (५) श्रावण धर्मा वंजारी – वंचित बहुजन आघाडी (गॅस सिलेंडर) (६) अनिल (दाजी) भाईदास पाटील – अपक्ष (कॅमेरा बोर्ड) (७) संदिप युवराज पाटील – अपक्ष (शिट्टी) यांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे मतदार संघातून माघार घेतलेल्या उमेदवारांमध्ये (१) अनिल (आबा) भाईदास पाटील – अपक्ष (२) जयश्री अनिल पाटील – अपक्ष (३) अनिता शिरीष चौधरी – अपक्ष (४) कांबळे नरेश दामोदर – अपक्ष या उमेदवारांचा समावेश आहे. साहजिकच भाजपा विरुध्द राष्ट्रवादीच्या उमेदवारांत निवडणूक दुरंगी होणार असल्याचे चित्र आहे.