राजमुद्रा फाऊंडेशन तर्फे स्त्री शक्तीचा जागर करीत विविध स्पर्धा संपन्न

अमळनेर : नवरात्रीनिमित्त राजमुद्रा फाऊंडेशन तर्फे स्त्री शक्तीचा जागर करीत स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. आई तुळजाभवानी च्या प्रतिमेची स्थापना करण्यात आली होती. लहान मुलांच्या सुप्तगुणांना वाव देण्यासाठी फॅन्सी ड्रेस तर महिलांसाठी संगीतखुर्ची,पाककला व मेहंदी स्पर्धा आदींचे आयोजन करण्यात आले होते. प्रत्येक दिवशी उत्कृष्ट दांडिया खेळाडू व उत्कृष्ट वेशभूषा सादर करणाऱ्या खेळाडूला राजमुद्रा फाऊंडेशन तर्फे चांदीची राजमुद्रा बक्षिस देण्यात आले. तसेच शेवटच्या दिवशी दांडिया किंग व दांडिया क्वीन यांना सोन्याची राजमुद्रा बक्षीस म्हणून देण्यात आली. कार्यक्रमाचे ठिकाणी माँसाहेब जिजाऊ, सावित्रीमाई, माता रमाई, अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमा लावण्यात आल्या होत्या. प्रवेशद्वाराला हिरकणीचे नाव देऊन संपूर्ण स्त्री शक्तीचा जागर करण्यात आला. या उपक्रमांना विविध मान्यवरांनी भेटी दिल्या. त्यात जळगाव जिल्ह्याचे पोलीस उपअधीक्षक सचिन गोरे व अमळनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अंबादास मोरे तसेच रेखाताई चौधरी, अनीताताई चौधरी, वंदनाताई चौधरी, वसुंधरा लांडगे , मोनाली पाटील, हेतल गोहिल आदींनी भेट देवून उपक्रमाचे कौतुक केले.
सदरील उपक्रम यशस्वी करण्यासाठी राजमुद्रा फाउंडेशनचे मार्गदर्शक तथा नगरसेवक श्याम पाटील, अक्षयकुमार चव्हाण तसेच राजमुद्रा दांडिया उत्सवाचे अध्यक्ष दर्पण वाघ, उपाध्यक्ष निनाद शिसोदे, उज्वल मोरे ,कार्याध्यक्ष सागर ठाकरे, खजिनदार अक्षय पाटील, सचिव राहुल पाटील, उमेश पाटील तसेच राजमुद्रा फाउंडेशनचे पदाधिकारी आशिष पवार, किरण सुर्यवंशी, बापूसाहेब नेरकर, किशोर पाटील, योगेश नेरकर, भूषण सोनवणे, विशाल पाटील, तेजस पवार, गौरव पाटील, भूषण भदाणे, महेश लोढा, सागर भावसार, अमोल जव्हेरी, मंजित सोनार, तुषार वायकर, निलेश महाजन, अमोल पाटील, हर्षल महाजन, सारंग लोहार, राज लोहार, राजरत्न सोनवणे, कुणाल पाटील, अरविंद मोरे, दिशांत पाटील आदींनी परिश्रम घेतले.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!