
अमळनेर : अमळनेर विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, रि.पा.ई.(कवाडे गट), शेतकरी कामगार पक्ष, स्वाभिमानी संघटना, समाजवादी पक्ष, मित्रपक्षांचे महाआघाडीचे अधिकृत उमेदवार अनिल भाईदास पाटील यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व राष्ट्रवादीची मुलुख मैदान तोफ अमोल मिटकरी यांची जाहीर सभा गुरुवार ता. १० रोजी येथील ग्लोबल स्कूलच्या मैदानावर अायोजित करण्यात आली आहे. अमोल मिटकरी हे उत्कृष्ट वक्तृत्वामुळे प्रकाशझोतात आले असून त्यांची युट्युब वरील भाषणे खूपच गाजत आहेत.
या जाहीर सभेस तमाम अमळनेर विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, रि.पा.ई.(कवाडे गट), शेतकरी कामगार पक्ष, स्वाभिमानी संघटना, समाजवादी पक्ष, मित्रपक्षांचे महाआघाडीच्या कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष सचिन बाळू पाटील व काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गोकुळ बोरसे यांनी केले आहे.

