महाराष्ट्र पत्रकार संघ, अमळनेर शाखेच्या वतीने मुख्यमंत्री ठाकरे यांना विविध मागण्यांचे पत्र

जनता कर्फ्यू व लॉकडाऊनमुळे पत्रकार व त्यांच्या कुटुंबासाठी मदतीचे विशेष पॅकेज मिळावे व पत्रकारांना पोलीसांकडून वृतांकन करताना मारहाण व अडवणूक न होण्याची मागणी.

अमळनेर : राज्यात कोरोना सारख्या महाविषाणूचा फैलाव जोरात सुरु होताच आपण घेतलेल्या जनता कर्फ्यू व लॉकडाऊनचा स्तुत्य निर्णय घेण्यात आला. जनता कर्फ्यू व लॉकडाऊनमुळे पत्रकार व त्यांच्या कुटुंबासाठी मदतीचे विशेष पॅकेज मिळावे व पत्रकारांना पोलीसांकडून वृतांकन करताना मारहाण व अडवणूक न होण्याची मागणी महाराष्ट्र पत्रकार संघ, अमळनेर शाखेच्या वतीने मुख्यमंत्री ठाकरे यांना ई मेलने पत्राद्वारे केली आहे.

पत्रात म्हटले आहे की, महाराष्ट्रातील नागरिक कोरोनाच्या संकटाचा सामना करीत आहेत. पोलीस, डॉक्टर्स व प्रशासकीय यंत्रणेबरोबर पत्रकार, प्रेस फोटोग्राफर बांधवही आपल्या जिवाची पर्वा न करता जनजागृती करीत आहेत. काम करीत असतांना काही ठिकाणी पत्रकार बंधूंना पोलीसांनी मारहाण केली. निर्माण झालेल्या या परिस्थितीमुळे अनेक पत्रकारांना खुप अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. तेव्हा पत्रकार मग तो प्रिंट मिडीयाचा असो किंवा इलेक्ट्रॉनिक मिडीयाचा असो या सर्वांचा गांभीर्याने विचार करून अन्य घटकांप्रमाणे त्यांना आर्थिक मदतीचे पँकेज द्यावे, या कालावधीत पत्रकारांच्या वाहनांना पेट्रोल/डिझेल चा पुरवठा सुरळीतपणे व्हावा, ओळखपत्र असणा-या पत्रकारांना पोलीसांनी मारहाण अथवा अडवणूक करु नये अशा मागण्यांचा समावेश आहे. महाराष्ट्र पत्रकार संघाचे राज्याध्यक्ष विलासराव कोळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यातील सर्व जिल्हाध्यक्ष, राज्य पदाधिकारी, तालुकाध्यक्ष, पदाधिकारी यांनी आज पत्र दिले. अमळनेर शाखेच्या वतीने राज्य कार्यकारणी सदस्य ईश्वर महाजन यांनी ता.२९ मार्च २०२० रोजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना ई मेल पाठविला आहे.

Share this news:

2 thoughts on “महाराष्ट्र पत्रकार संघ, अमळनेर शाखेच्या वतीने मुख्यमंत्री ठाकरे यांना विविध मागण्यांचे पत्र

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!