माजी आमदार शिरीष चौधरी यांनी प्रशासन अधिकाऱ्यांसोबत घेतला कोरोना परिस्थितीचा आढावा

सामाजिक भान राखत गरजेवेळी इंदुमाई निवासस्थान उपलब्ध करून देण्याचे माजी आमदार चौधरी यांचे आश्वासन

अमळनेर : माजी आमदार शिरीष चौधरी यांनी काल ता.२८ रोजी प्रांताधिकारी, तहसिलदार व आरोग्य अधिकाऱ्यांसोबत कोरोनाबाबत चर्चा करून सद्य परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी सामाजिक भान राखत गरज असेल तर आयसोलेशन कक्षासाठी इंदुमाई निवासस्थान उपलब्ध करून देऊ असे माजी आमदार चौधरी यांनी सांगितले. कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी व कोरोना प्रतिबंधासाठी सर्वतोपरी मदत करण्याची ग्वाही त्यांनी दिली. प्रांताधिकारी सिमा अहिरे यांनी जर गरज वाटली तर नक्कीच आयसोलेशन कक्षासाठी इंदुमाई निवासस्थान वापरले जाईल असे सांगितले. या आढावा बैठकीस तहसीलदार मिलिंद वाघ, गट विकास अधिकारी संदीप वायाळ, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. गिरीष गोसावी, अमळनेर ग्रामीण रुग्णालयाचे आरोग्य अधिकारी डॉ. प्रकाश ताडे, डॉ. महाजन, गटनेते तथा नगरसेवक बबली पाठक, पंकज चौधरी, किरण गोसावी, बाळासाहेब संदानशिव, आबू महाजन आदी उपस्थित होते.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!