
अमळनेर : तालुक्यातील भिलाली येथे सामर्थ्य प्रतिष्ठान च्या वतीने कोरोना तसेच ईतर साथीच्या रोगांवर उपाययोजना म्हणुन निर्जंतुक फवारणी करण्यात आली. संपूर्ण गावातील घरांच्या आजुबाजूचा परीसर, गटारी, स्वच्छतागृह, प्राण्यांचे गोठे, उकीरडे, ग्राम पंचायत कार्यालय, मंदिरे तसेच सार्वजनिक ठिकाणी फवारणी तसेच पदाधिकारी आणि कर्मचार्यांना मास्क वाटप करण्यात आले. तसेच बाहेरुन आलेले होम क्वारंटाईन लोकांना घरातुन बाहेर न पडण्याचे व प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.
यावेळी सामर्थ्य प्रतिष्ठान चे अध्यक्ष अमोल माळी, सरपंच छायाबाई पाटील, पोलीस पाटील दगा पाटील, आशा स्वयंसेविका कल्पना माळी, सामाजिक कार्यकर्ते अविनाश पाटील, माजी सरपंच दिनेश माळी, ग्रा.पं.सदस्य भाऊसाहेब राजपूत, कोतवाल, सागर पाटील, लोटनसिंग गिरासे, दगडू माळी, छोटु माळी, परेश पाटील आदी उपस्थित होते.