अमळनेर : कोरोना व्हायरसमुळे लॉकडाऊन सुरु असताना येथील काँग्रेस कमिटीतर्फे रोजंदारी ने काम करणाऱ्यांना प्रभाग क्रमांक ६ मध्ये नगरसेवक मनोज भाऊराव पाटील यांच्या कडून गरीब लोकांना जीवनावश्यक किराणा वस्तू गहु , तांदूळ व डेटॉल साबण अशा छोट्या मदतीचे वाटप करण्यात आले.
यावेळी कॉंग्रेस तालुका अध्यक्ष गोकुळ नामदेव पाटील, सौ.नुतन मनोज पाटील, शिवसेना महिला उपजिल्हाप्रमुख मनिषाताई परब, रवि पाठकरी, महेश कासार, रऊफ दादा, जय पाटील, पप्पु शेख, मनोज बोरसे, जुबेर पठाण, तुषार संदानशिव, सागर कुंभार, आसिफ शेख, मोईन शेख, फारुख पठाण, समीर शेख व प्रभागातील काँग्रेस सदस्य उपस्थित होते.