सुप्रसिद्ध भूवैज्ञानिक उपेंद्रदादा धोंडे यांच्या प्रेरणेतून सहज जलबोध अभियानाचा महाराष्ट्रात प्रारंभ

पुणे : गुढीपाडव्याचे मुहूर्तावर ता.२५ पासून राज्यात ‘अवघा महाराष्ट्र जलसाक्षर करील’ या ब्रीद वाक्याने सहज जलबोध अभियानास सुरुवात करण्यात आली. लेख- मालिका- पुस्तके- व्याख्याने अशा लिखीत साहित्य माध्यमातून भूजल विज्ञान तळागाळापर्यंत सर्वसामान्यांना सहज-सोप्या भाषेत उपलब्ध करून देण्यासाठी आणि त्याद्वारे तांत्रिकता दृष्टीने परिपूर्ण असा कृती कार्यक्रम राबविण्याचा हा संकल्प म्हणजे ‘सहज जलबोध अभियान’ होय. हे अभियान ‘अवघाची महाराष्ट्र जलसाक्षर करील’ हे ब्रीद घेऊन मैदानात उतरलेल्या, महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध भूवैज्ञानिक उपेंद्रदादा धोंडे यांच्या प्रेरणेतून सुरू झाले आहे.

महाराष्ट्रातील ४४ हजार गावात आणि सर्व शहरात, म्हणजे ग्रामीण व शहरी अशा दोन्ही भागात तंत्रशुद्ध ‘सहज जलबोध संकल्पना’ पोहचविणे हे अभियानाचे प्रमुख उद्दिष्ट आहे. जर आपण जलक्षेत्रात कार्यरत आहात वा इच्छुक आहात, चिकित्सक-जिज्ञासू आहात, संपूर्ण भुजल विज्ञान आपल्या हाती सुलभ भाषेत उपलब्ध असावे असे वाटत असेल तर आणि महत्त्वाचे म्हणचे जर आपण तांत्रिकतेला प्राधान्य देणारे आहात तर आपण जरूर या अभियानात सहभागी होऊ शकता. या अभियानात समाजातील नागरिकांना जल क्षेत्रातील तांत्रिकता बाबत पाच पुस्तकांचा संच भेट दिला जाणार आहे. ग्रामीण भागात दरवर्षी दुष्काळी परिस्थितीला सामोरे जावे लागते. दुष्काळ निवारण करायचा असेल तर जल क्षेत्रात तांत्रिक दृष्टीने काम करणे गरजेचे आहे. यासाठी महाराष्ट्र हा जल साक्षर होणे गरजेचे आहे. यासाठी हे अभियान भविष्यात जल क्षेत्रात परिवर्तन घडवून आणणार आहे.

गावाचा संपूर्ण जल आराखडा तयार करणे, निसर्गबेट पद्धतीने वनीकरण, आदर्श जलव्यवस्थापन(पिण्याचे पाणी व शेतीमधील), कचरा व्यवस्थापन, नदी प्रदूषण, सांडपाण्यावर प्रक्रिया, पर्जन्य साठवण करणे व पारंपरिक जलस्रोतांचे नूतनीकरण ही अभियानाची ठळक वैशिष्ट्ये आहेत. महाराष्ट्र मधील प्रत्येक व्यक्तीने जल साक्षर होणे हे भविष्यातील गरज आहे. यासाठी सर्वांनी या अभियानात सहभागी व्हावे असे आवाहन सहज जलबोध अभियानाचे राज्यस्तरीय समन्वयक मयुर बागुल यांनी कळविले आहे.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!