राजमुद्रा फाऊंडेशनचा जीवनावश्यक वस्तू घरपोच पुरविण्यासाठी सहभाग; घरातच राहण्याचे आवाहन

लॉकडाऊन यशस्वी करण्याकरीता उपक्रमाची सुरुवात

अमळनेर : राजमुद्रा फाऊंडेशनच्या वतीने नेहमीच आगळे वेगळे सामाजिक उपक्रम राबविले जातात. कोरोना आजाराशी लढा देण्यासाठी ठेवण्यात आलेला लॉकडाऊन १०० % यशस्वी करण्याकरीता लोकांना घरातच राहण्याचे आवाहन फाऊंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे. येथील ढेकूू रोड- पिंपळे रोड परिसरात औषधी, भाजी पाला, किराणा सामान, गॅस सिलिंडर, दूध, पाण्याचे जार या जीवनावश्यक वस्तू घरपोच पुरविण्यासाठी राजमुद्रा फाऊंडेशननेे सहभाग घेतला असून आवश्यक सेवेसाठी अक्षय पाटील ७३७८८०२१०८, उज्ज्वल मोरे ८६६८२२८३१३ हे हेल्पलाईन नंबर देण्यात आले आहेत. या क्रमांकावर फोन केल्यास वस्तूंची तात्काळ उपलब्धता करण्यात येईल. सदर उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी राजमुद्रा फाऊंडेशनचे कार्यकर्ते अक्षय चव्हाण, अक्षय पाटील, उज्ज्वल मोरे, निनाद शिसोदे, सारंग लोहार, दर्पण वाघ, हर्षल महाजन हे कार्यरत आहेत. उपक्रमाची सुरुवात मा.आ. कृषीभूषण साहेबराव पाटील, प्रांताधिकारी सीमा अहिरे, तहसीलदार मिलिंद वाघ, पोलीस निरीक्षक अंबादास मोरे, राजमुद्रा फाऊंडेशनचे अध्यक्ष तथा नगरसेवक श्याम पाटील यांच्या हस्ते करण्यात आली. जास्तीत जास्त लोकांनी उपक्रमाचा लाभ घेऊन प्रशासनास सहकार्य करावे तसेच आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी असे आवाहन राजमुद्रा फाऊंडेशनचे अध्यक्ष तथा नगरसेवक श्याम पाटील यांच्या वतीने करण्यात आले आहे

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!