धुडकू पाटील यांचे वृद्धापकाळाने निधन

कोरोना साथीमुळे अंत्यसंस्कारानंतर कुठलाही धार्मिक विधी न करण्याचा कुटुंबियांचा निर्णय

धुळे : तालुक्यातील बोरविहीर येथील आदर्श शेतकरी ह.भ.प धुडकू धोंडू पाटील ऊर्फ भाऊसिंग जिभाऊ यांचे शनिवार, ता.४ रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. मृत्यु समयी ते ८८ वर्षांचे होते. त्यांनी येथील विठ्ठल मंदिर ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष व बोरविहीर विद्या प्रसारक संस्थेचे माजी संचालक या पदावर उत्कृष्ट कामगिरी बजावली होती. देशात कोरोना साथीने थैमान घातले असल्याने त्यांच्या कुटुंबियांनी अंत्यसंस्कारानंतर कुठलाही धार्मिक विधी न करण्याचा निर्णय घेऊन समाजात एक आदर्श निर्माण केला आहे. त्यांचे पश्चात दोन मुले, सूना, नातवंडे असा परिवार आहे. कार्यकारी अभियंता अर्जुन सोनवणे व राजेंद्र सोनवणे यांचे ते वडील होत.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!