प्रशासनातर्फे विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर जनजागृती कक्ष

अमळनेर : येथील तहसील कार्यालयात विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर ईव्हीएम मशीनआणि व्हीव्हीपॅट सह स्वतंत्र जनजागृती कक्ष स्थापन करण्यात आला आहे. मतदारांना आपले नाव मतदार यादीत शोधता यावे यासाठी सर्वतोपरी मदत केली जात आहे. यामुळे अनेक मतदारांची सोय झाली आहे. मतदार जनजागृतीसाठी सेल्फी पाॅईंटही उभारला आहे.
स्वतंत्र जनजागृती कक्षाचा अमळनेर मतदार संघातील मतदारांनी लाभ घ्यावा, असे आवाहन प्रांताधिकारी सीमा अहिरे यांनी केले आहे. यावेळी तहसीलदार मिलिंद वाघ, नगरपालिका मुख्याधिकारी शोभा बाविस्कर उपस्थित होते.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!