कार्याध्यक्ष पदी योगेश मुंदडे तर कार्योपाध्यक्ष पदी निरज अग्रवाल यांची निवड
अमळनेर : येथील खान्देश शिक्षण मंडळाच्या पदाधिकारी निवडीची घोषणा काल ता.९ एप्रिल रोजी प्रथमत: व्हिडीओ कान्फरन्सींग द्वारे सर्वानुमते करण्यात आली. यात कार्याध्यक्ष पदी योगेश मुंदडे तर कार्योपाध्यक्ष पदी निरज अग्रवाल यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. खा.शि.मंडळाच्या शैक्षणिक वाटचाली करिता ही निवड महत्वाची समजली जाते. सकाळी साडेअकरा वाजता संस्थेचे चिटणीस प्रा.डॉ.ए.बी. जैन यांनी व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे सर्व कार्यकारी मंडळाला अजेंडा वाचून दाखवला . त्यानंतर संस्थेची प्रथा, नियम व निकषांप्रमाणे कार्याध्यक्ष व कार्योपाध्यक्ष पदासाठी निवड प्रक्रिया झाली. याआधीचे कार्याध्यक्ष प्रदीप अग्रवाल व कार्योपाध्यक्ष संदेश गुजराथी यांचा कार्यकाळ संपल्याने ही निवड झाली. त्यांच्या निवडीबद्दल संस्थेचे सर्व पदाधिकारी, सर्व प्राध्यापक वर्ग, शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी, राजकीय व सामाजिक नेते, मित्रपरिवार कडून व्हाट्सअप व फेसबुक द्वारे अभिनंदन होत आहे.

