कॅन्सरग्रस्त पत्नीचे दुःख सावरत असताना दु:खीतांचे अश्रू पुसणारा तरुण संदीप बिरारी; समाजापुढेे आदर्श

कोरोनामुळे बेरोजगारीची वेळ आलेल्या पावरा, भिल्ल व मांग गारूडी समाजातील दोनशे कुटुंबांना मदतीचा हात


अमळनेेर : तालुुक्यातील पातोंडा येथील तरूण संदीप बिरारी याने आपली पत्नी कॅन्सरग्रस्त असतांना देखील स्वतःचे दुःख बाजूला ठेवत कोरोना आजाराने बेरोजगारीची वेळ आलेल्या पातोंडा, नगाव व नांद्री येथील पावरा, भिल्ल व मांग गारूडी समाजातील दोनशे कुटुंबांना मदतीचा हात पुढे केला. कॅन्सरग्रस्त पत्नीचे दुःख सावरत असतांना दु:खीतांचे अश्रू पुसणारा तरुण संदीपनेेे समाजापुढेे आदर्श ठेेेेवला.

संदीप हा युपीएल कंपनीत ठाणे व पालघर जिल्हा सेल्स अधिकारी म्हणून कार्यरत आहे. संदिप हा पत्नी व दोन लहान मुलांसोबत शहापूरला राहतो. नऊ महिन्यांपुर्वी संदीपच्या पत्नीला मेंदूला गाठ असल्याचे निष्पन्न झाले. ती गाठ कॅन्सरची असल्याचे निदान डाॅक्टरांनी केले. वयाच्या अवघ्या २८ व्या वर्षी आपल्या पत्नीला मेंदूचा कॅन्सर झाल्याचे समजल्यावर संपूर्ण कुटूंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला. मुंबई येथील टाटा मेमोरियल येथे ऑगस्ट महिन्यात शस्त्रक्रिया करण्यात आली. सध्या टाटा मेमोरियल येथे तिच्यावर उपचार सुरू आहेत. अशा परिस्थितीत मी एवढे दुःख पाहिले आहे यात मला माझी मुले डोळयासमोर आली की, मला इतरांच्या लहान लहान मुला बाळांची काळजी वाटते. त्यातूनच मी सध्या कोरोनामुळे बेरोजगार झालेल्या पातोंडा, नगाव व नांद्री येथील पावरा, भिल्ल व मांग गारूडी समाजातील असहाय कुटूंबांना मदत करण्याची प्रेरणा मला मिळाली असे मनोगत संदीपने व्यक्त केले. या दोनशे कुटुंबांना प्रत्येकाच्या घरी जाऊन सोशल डिस्टन्सींगचे पालन करत प्रत्येकास साखर, चहा पावडर, आंघोळीचा साबण, तेल, मिरची पावडर, मसाला, हळद, जिरे असा बाजार वाटप करण्यात आला. असे म्हणतात की, जो दुःखात असतो त्यालाच दुस-याचे दुःख समजते याप्रमाणे संदीपने या कुटूंबांना मदत केली. लाॅकडाऊन वाढला तर पुढील महिन्यात देखील मदत करू असेही आश्वासन या कुटूंबांना दिले. या प्रसंगी सर्व कुटूंबांनी संदीप स्वतः दुःखात असूनही आमच्या मदतीला धावून आला म्हणून त्याचे कुटूंब या संकटातून लवकर बाहेर पडो असे मनापासून भरभरून आशिर्वाद दिले. पावरा, भिल्ल व मांग गारूडी समाजाला बाजार वाटप प्रसंगी संदीप बिरारी , विनायक दादा बिरारी, सरपंच प्रतिनिधी किशोर मोरे, उपसरपंच सोपान लोहार, ग्रा.पं.सदस्य गजानन बिरारी, सागर मोरे , महेंद्र पाटील, भुषण बिरारी, घन:शाम पाटील, विनोद पवार, मच्छिंद्र वाघ, राकेश देवरे, सोनू देवरे, मुरलीधर बिरारी, अनिल बिरारी, सोपान शिंदे, योगेश बिरारी व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!