
अमळनेर : तालुक्यातील मारवड येथील मूळ रहिवासी चेतनाबाई उर्फ विठाबाई दौलतशेठ बडगुजर (ह.मु.गुलमोहर कॉलनी, अमळनेर) यांचे आज पहाटे दीर्घ आजाराने निधन झाले. मृत्यू समयी त्या ६६ वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चात पती, मुले, मुली, जावई, सुना व नातवंडे असा परिवार आहे. त्या ऑर्डनस फॅक्टरीचे निवृत्त सुप्रिटेन्डेंट दौलतशेठ बडगुजर यांच्या पत्नी तर शेळावे खुर्द जि. प. शाळेचे प्राथमिक शिक्षक केशव बडगुजर व हितेंद्र बडगुजर यांच्या मातोश्री होत.