अमळनेरची संख्या आता ४६ वर ; दक्षतेचा ईशारा
जळगाव: जिल्ह्यातील स्वॅब घेतलेल्या ८४ कोरोना संशयित व्यक्तीचे नमुना तपासणी अहवाल आज नुकतेच प्राप्त झाले आहे. यापैकी ६५ व्यक्तीचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले असून १९ व्यक्तींचे तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. पॉझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तींमध्ये भुसावळ येथील एक व्यक्ती तर अमळनेर येथील अठरा व्यक्तींचा समावेश आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित रूग्णांची संख्या ८५ इतकी झाली असूून अमळनेरची संख्या आता ४६ वर पोहचली आहे. त्यापैकी जिल्ह्यातील १३ रूग्णांचा मृत्यू झाला आहे तर दोन रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डाॅ नागोराव चव्हाण यांनी दिली.