माजी आमदार शिरीष चौधरी मित्र परिवार तर्फे शहरात स्वखर्चातून निर्जंतुकीकरन फवारणी

अमळनेर : शहरात कोरोना विषाणू चा संसर्गात वाढ सुरू असल्याने शहरातील जनता भयभीत झाली आहे. शहरातील डॉक्टर्स रुग्णांचे निदान करीत असल्याने त्यांचे कार्य कौतुकास्पद आहे. सध्याचा काळ राजकारण करण्याचा नसून नागरिक व प्रशासन यांच्यात मेळ घालून देण्याचा आहे. प्रशासनाचे व नागरिकांचे मनोबल वाढवण्याचं काम आपणा सर्वांचे आहे. तसेच कॅन्टोन्मेंट झोन मधील बांधव व माजी आमदार शिरिषदादा चौधरी मित्र परिवार आघाडी च्या नगरसेवकांची निर्जंतुकिकरण फवारणी ची मागणी होत होती. त्या अनुशंगाने प्रशासनाला विचलीत न करता आज स्वखर्चाने शहरासाठी दोन आत्याधुनिक निर्जंतुकीकरण फवारणी यंत्र व त्यासाठी लागणारे १ हजार लिटर निर्जंतुकीकरण रसायन देखील उपलब्ध करून देण्यात आले. सर्व डॉक्टर्स, नगरपालिकेचे कर्मचारी, पोलीस व कोरोना वारीयर्स घेत असलेल्या मेहनतीचे कौतुक करुन जनतेच्या वतीने त्यांच्या ऋणात राहू असे माजी आमदार शिरिषदादा चौधरी यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले की, फक्त राजकारण न करता जनतेची सेवा करण्याची आमची भूमिका आहे. ‘जिथे कमी.. तिथे आम्ही’ ह्या उक्तीप्रमाणे आम्ही पुढेही वाटचाल करणार आहोत. आता या गंभीर परिस्थिती चे भान ठेवून कोरोना योद्धांच्या मदतीने अहोरात्र सेवा करुन अमळनेर मधून कोरोना ला हद्दपार करू अशी आशा त्यांनी व्यक्त केली. नागरिकांनी घाबरून न जाता, जागृत राहून कोरोना विरोधातली ही लढाई जिंकायचीच आहे. हा विश्वास व्यक्त करतांना नागरिकांनी संयम ठेवत सतर्क राहावे तसेच काही अडचण आल्यास माझ्या कार्यालयात संपर्क करा असे आवाहनही मा.आ.शिरिषदादा चौधरी यांनी या प्रसंगी केले. यावेळी प्रांताधिकारी सीमा अहिरे, तहसीलदार मिलिंद वाघ, पोलीस निरीक्षक अंबादास मोरे, न.पा. प्रशासन अधिकारी संजय चौधरी, गटनेते प्रविण पाठक, नरेंद्र चौधरी, पंकज चौधर, योगराज संदानशिव, सुनिल भामरे ,अबु महाजन, किरण गोसावी, किरण पाटील, संतोष पाटील, संतोष लोहरे, राजु चौधरी, दिनेश चौधरी उपस्थित होते.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!