आमदार अनिल पाटील यांनी लग्नाचे निमित्त साधून दिला पहिल्या दिवसाचा अन्नदान खर्च

अमळनेर : येथील कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर लॉक डाऊनच्या चौथ्या टप्प्यात हजारो गरजू कुटुंबाना अन्न उपलब्ध व्हावे म्हणून अमळनेर प्रशासनाने केलेल्या सुचनेनुसार श्रीमती भानूबेन शहा गोशाळेतर्फे अन्नक्षेत्र उपक्रम पुन्हा सुरू करण्यात आला. आमदार अनिल पाटील व जि.प.सदस्य सौ जयश्री पाटील यांनी लग्नाच्या वाढदिवस निमित्ताने अन्नदानाचा खर्च उचलत मिष्टान्न भोजन दिले. लॉक डाऊन ४ मध्ये अमळनेर शहरातील गरीब गरजूंना रोजगार उपलब्ध नसल्याने उपासमारीची वेळ येऊ नये म्हणून प्रशासनाच्या वतीने तहसीलदार मिलिंद वाघ यांनी गोक्षेत्र प्रतिष्ठाण संचलित श्रीमती भानूबेन शहा गोशाळेस पत्र देऊन अन्नक्षेत्र उपक्रम सुरू करण्याबाबत सुचविले होते. त्यानुसार आमदार अनिल पाटील यांनी लग्नाचे निमित्त साधून पहिल्या दिवसाचा खर्च देत अन्नक्षेत्र पुन्हा सुरू करण्यात आले. यावेळी गोशाळेत सौ.जयश्री पाटील यांच्या हस्ते अन्न वाटपास सुरुवात करून शुभारंभ करण्यात आला. यावेळी चेतन शहा यांनी आ.अनिल पाटील व सौ.जयश्री पाटील यांना लग्न वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात. तर प्रा अशोक पवार, संदिप घोरपडे, रणजित शिंदे, गोपाळ कुंभार, मनोज चौधरी आदिंनी अन्नक्षेत्राला मदत केल्याबद्दल आभार मानले. याप्रसंगी मा नगरसेवक विनोद कदम, युवक अध्यक्ष बाळू पाटील तसेच मंगळ ग्रह मंदिर संस्थानचे विश्वस्त डिगंबर महाले, बाविस्कर सर, बहिरम सर, संजय पालकर आदि यावेळी उपस्थित होते.
श्रीमती भानूबेन शहा गोशाळेस कोरोना साथीच्या काळात यशस्वी पणे सुरू असलेल्या अन्नक्षेत्र उपक्रमाच्या कार्याबद्दल नुकतेच डॉ.एपीजे अब्दुल कलाम इंटर नॅशनल फाउंडेशन तर्फे डिजिटल पत्र पाठवून गौरविण्यात आले आहे. नाशिक येथे दिवंगत राष्ट्रपती डॉ.एपीजे अब्दुल कलाम यांच्या नातेवाईकांच्या उपस्थितीत संभारंभपूर्वक गौरव करण्यात येणार आहे. सदरचा गौरव हा अन्नक्षेत्राला मदत करणाऱ्या अनेक दान दात्यांच्या उदार भावनेचा व उत्स्फूर्त सहकार्य करणारे सामाजिक कार्यकर्ते व सर्व पत्रकार बंधू आणि प्रशासनाच्या सामूहिक प्रयत्नांचा आहे असे गोक्षेत्र प्रतिष्ठाण चे संचालक चेतन शहा यांनी कृतज्ञता पूर्वक यावेळी सांगितले.