कोरोनाचे पार्श्वभूमीवर खवशी येथे शासन निर्देशांचे पालन करत आदर्श विवाह सोहळा

अमळनेर : ताालुक्यातील खवशी येथील शशिकांत बळीराम कापडे यांची मुलगी व प्रसाद कापडे यांची भगिनी ऐश्वर्या आणि एकतास येथील हरिश्चंद्र वाघ यांचा मुलगा राकेश यांचा आदर्श विवाह आज खवशी येथे पार पडला. या विवाहासाठी जिजाऊ बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्षा तथा भाजपा नेत्या अॅड ललिता ताई पाटील, अमळनेर पं.स. चे गटविकास अधिकारी संदीप वायाळ यांची प्रमुख उपस्थिती होती.

जगभर कोरोना ने थैमान घातल्याने ठरलेल्या तिथीनुसार अनेेकांचे लग्न सोहळे होवू शकले नाहीत. या पार्श्वभूमीवर वधु वर दोनही पक्षाकडील ज्येष्ठ मंडळींनी एकत्र येेेेवून शासन निर्देशांचे पालन करत मोजक्या नातेवाईकांंच्या उपस्थितीत विवाह पार पाडण्याचे नियोजन केले होते. या निर्णयाचे स्वागत करत शासन निर्देशांनुसार मास्कचा वापर व सोशल डिस्टन्सिंग ठेवत सदर विवाह आज खवशी येथे पार पडला. विवाहासाठी वधु वर दोनही पक्षाकडील सुमारे वीस नातेवाईक उपस्थित होते. नवदांपत्याच्या भावी वाटचालीस दिव्यचक्र परिवारातर्फे शुभेच्छा..!

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!