
अमळनेर : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊन चा चौथा टप्पा घोषित झाला. यामुळे गोरगरीब जनता हलाखीच्या परिस्थितीत जीवन व्यतित करीत आहे. अशा परिस्थितीत अमळनेर शहर व ग्रामीण भागात अमळनेर शिवसेने तर्फे पालकमंत्री नामदार गुलाबरावजी पाटील व पाळधी येथील साईबाबा संस्थान यांच्या सहकार्याने ५०० कुटुंबांना ‘शिवसेनेची शिदोरी’ दिली आहे. या शिदोरीवर सुमारे पंधरा दिवस पुरेल एवढे गव्हाचे पीठ, तांदूळ, तेल, साखर, चटणी, मसाला, मीठ, चहा, हळद, ११ किलो वजनाच्या जीवनावश्यक वस्तू आहेत. अमळनेर शिवसेना पदाधिकाऱ्यांनी घरोघरी ही शिदोरी पोहच केली.

तालुक्यातील पाडळसरे गावात गट विकास अधिकारी संदीप वायाळ, शिवसेना उपजिल्हाप्रमुख डॉ.राजेंद्र पिंगळे, तालुकाप्रमुख विजू मास्तर, शहरप्रमुख संजय पाटील, उपतालुका प्रमुख चंद्रशेखर पाटील यांनी तर शहरात पैलाड भागात संजय पाटील यांनी शिदोरीचे वाटप केले. कासार गल्लीत पाव, बटर, खारी विक्रेता शिवसैनिक बापू कोळी याच्या आईचे नुकतेच निधन झाल्याने या हलाखीच्या परिस्थितीत त्यास २ बॅग शिदोरी ची मदत उप जिल्हाप्रमुख डॉ.राजेंद्र पिंगळे, शहरप्रमुख संजय पाटील, विशाल शर्मा, बुथप्रमुख जगदीश शिंपी, रणजित बाविस्कर, राष्ट्रवादीचे युवा अध्यक्ष सुनिल शिंपी यांनी केली. माजी शहरप्रमुख प्रताप शिंपी व उप शहरप्रमुख जीवन पवार यांनी प्रभाग १५ मध्ये शिदोरी वाटप केली. प्रतापनगर भागात महिला आघाडीच्या उप जिल्हाप्रमुख सौ.मनीषा परब, सौ संगीता शिंदे, बाबूभाऊ परब यांनी, मंगलादेवी चौक येथे माजी नगरसेवक राजू फापोरेकर यांनी, पारधीवाडा येथे नगरसेवक संजय पवार, शिवोम नगरात उप शहरप्रमुख मोहन भोई यांनी शिदोरी वाटप केली. ग्रामीण भागात तालुकाप्रमुख विजू मास्तर, उप तालुकाप्रमुख शिवकुमार पाटील, सुंदरपट्टीचे सुरेश पाटील आदींनी गरजूंना ही ‘शिवसेना शिदोरी’ वाटप केली, ह्या कामात पैलाड चे शिवसेना पदाधिकारी विजय नवल पाटील, समाधान पाटील, विश्वजित पाटील यांनी सहकार्य केले. गरजू कुटुंबांनी शिवसेना चे व नामदार गुलाबरावजी पाटील व पाळधी येथील साईबाबा संस्थान यांचे आभार मानलेत.