गोक्षेत्र प्रतिष्ठाण संचलित श्रीमती भानूबेन शहा गोशाळेतर्फे सुरू असलेल्या अन्नदानासाठी सहभाग

अमळनेर : कोरोना साथीत गोक्षेत्र प्रतिष्ठाण संचलित श्रीमती भानूबेन शहा गोशाळेतर्फे सुरू असलेल्या अन्नदानासाठी अनेक दाते पुढे येत आहेत. आमदार अनिल पाटील, मा.आ.स्मिताताई वाघ, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रफुल्ल पाटील यांच्या पुढाकाराने शहरातील हजारो गोर गरिबांसाठी सुरू असलेल्या या अन्नदानाच्या ४१ व्या दिवसाचा खर्च सामूहिक पणे अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीचे आडते, खरेदीदार, सर्व व्यापारी बांधवानी उचलत सामाजिक उत्तरदायित्व निभावले.
श्रीमती भानूबेन शहा गोशाळा येथे व्यापारी हरी भिका वाणी, संचालक शंकरसेठ बितराई, रमेश पुनमचंद छाजेड, ललित बाफना, प्रकाश वाणी, योगेश महाजन, निशांत पारेख आदिंनी उपस्थिती देऊन अन्नदान केले. गोशाळेतर्फे चेतन शहा व सहकारी यांनी सर्व दाते व पुढाकार घेणारे लोकप्रतिनिधी तसेच अन्नदानासाठी आर्थिक मदत करणाऱ्या व्यापारी, आडते, खरेदीदार दात्यांचे आभार मानले. अन्नदानासाठी गोशाळेस विविध केंद्रांवर राजू सेठ, पंकज दोडीवला, मनोज चौधरी, गोपाळ कुंभार, दिलीप पाटील, प्रताप पाटील, आबा पाटील, संदिप घोरपडे, प्रा.अशोक पवार, रणजित शिंदे आदिंनी परिश्रम घेतले.