अमळनेर तालुक्यामध्ये पुढील आदेश होईपावेतो शाळा, कॉलेज, हॉटेल्स, आईस्क्रीम पार्लर्स, मस्जीद, मंदीर, समाज मंदीरे, मंगल कार्यालये, सलुन, ब्युटी पार्लर बंद

तहसीलदार मिलिंद वाघ यांचे तालुक्यातील जनतेस आवाहन

अमळनेर : मा. जिल्हाधिकारी जळगाव यांचेकडील आदेश क्र.दंडप्र-०१/कावि/२०२०/२३५ दि २१/०५/२०२० चे आदेशान्वये जळगांव शहर महानगरपालिका जळगाव यांचे कार्यक्षेत्र वगळता जळगांव जिल्हयातील इतर क्षेत्राचा समावेश हा Non Red Zone (Orange & Green Zone) मध्ये करण्यात आलेला आहे. त्यानुसार, अमळनेर तालुक्यामध्ये शाळा, कॉलेज, हॉटेल्स, आईस्क्रीम पार्लर्स, मस्जीद, मंदीर, समाज मंदीरे, मंगल कार्यालये, सलुन, ब्युटी पार्लर इत्यादी ठिकाणे ही पुढील आदेश होईपावेतो बंद राहतील. यामुळे अनावश्यक बाजारामध्ये गर्दी करु नका,आवश्यक असल्यासच घराबाहेर पडा अन्यथा घरात रहा प्रशासनाला सहकार्य करा असे आवाहन तहसीलदार मिलिंद कुमार वाघ यांनी अमळनेर तालुक्यातील सर्व जनतेस केले आहे.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!