दैनिक पुण्य प्रताप चे संपादक व. ता. आबा पाटील व कार्यकारी संपादक डी.डी.नाना पाटील यांचे दातृत्व

अमळनेर : कोरोना संकटामुळे आर्थिक अडचणीत असणाऱ्या खऱ्या गोर गरीबांना ईद निमित्त मदत करण्यासाठी दैनिक पुण्य प्रताप चे संपादक व. ता. आबा पाटील व कार्यकारी संपादक डी.डी.नाना पाटील यांनी रोख स्वरूपात अकरा हजार रुपयांची मदत देवून आपले दातृत्व दाखविले. अमळनेर वकील संघाचे अध्यक्ष अॅड. शकील काझी यांचेकडे आज ही रक्कम सुपूर्द केली. ऍड. शकील काझी हे येथील जडीबुटीवाले सय्यद आरिफ व रफियोद्दीन ( रफा दादा, चुनाभट्टी) ह्या कार्यकर्त्यां मार्फत गरजूंना लागलीच वाटून देणार आहेत. यावेळी पत्रकार पांडुरंग पाटील, पप्पू पाटील आर्डीकर उपस्थित होते. याआधीसुद्धा कोरोनात अडचणीत आलेल्यांना व.ता.आबा व डी.डी. नाना यांनी मदत केली आहे. पत्रकार व. ता. आबा पाटील यांनी मुस्लिम समाजाचे कार्यकर्ता अॅड. शकील काझी यांचेमार्फत गोर गरिबांपर्यंत ही आर्थिक मदत यथायोग्य पद्धतीने पोहोचविण्यास सांगितले आहे.