प्रभाग क्र.१४ मध्ये ‘डॉक्टर देणार ऑनलाईन मोफत सेवा’ उपक्रमाचा तहसीलदारांच्या हस्ते शुभारंभ

नगरसेविका कमलबाई पितांबर पाटील यांचा उपक्रम

अमळनेर : शहरातील प्रभाग क्र. १४ मधील नागरिकांना लॉकडाऊन ४ मध्ये किरकोळ आजारासाठी, आजारी पडल्यास अथवा कोणत्याही प्रकारचा त्रास झाल्यास रात्री अपरात्री अडचण होवू नये व लॉकडाऊन चे पालन करता यावे यासाठी नगरसेविका कमलबाई पितांबर पाटील व रवि पाटील यांनी डॉक्टरांना विनंती करून प्रभागातील नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन केले होते. डॉक्टरांनी त्याला प्रतिसाद देत कोरोना आजाराला हरवण्याचा संकल्प केला असून ‘डॉक्टर देणार ऑनलाईन मोफत सेवा’ उपक्रमाचा तहसीलदार मिलींद वाघ यांचे हस्ते नुकताच शुभारंभ करण्यात आला. यावेळी नगरसेविका कमलबाई पितांबर पाटील, रवि पाटील, न.प.प्रशासन अधिकारी संजय चौधरी, डॉ.रईस बागवान, डॉ.संजय पाटील, डॉ.घनश्याम पाटील, डॉ.अमोल भोसले, डॉ.जितेंद्र पाटील, अशोक साळुंखे, राहुल शिंपी, ललित चौधरी, भूषण पाटील, लक्ष्मीकांत अहिरे, महेश पाटील, रोशन पाटील, उमेश चौधरी उपस्थित होते.

प्रभागातील कोणत्याही नागरिकाला साधा सर्दी, खोकला, डोकेदुखी, पोटदुखी सारखे आजार असतील, रात्री अपरात्री कोणत्याही प्रकारचा त्रास झाल्यास डॉक्टर मोफत सेवा देणार आहेत. ज्या व्यक्तीला त्रास होत असेल अश्या व्यक्तीने मेडिकल वर जाऊन डॉक्टरांना फोन करून आजाराची लक्षणे सांगावीत. डॉक्टर फोनवरच मेडिकल दुकान चालकास औषधी सांगतील किंवा योग्य मार्गदर्शन करतील. यामुळे दवाखान्यात गर्दी होणार नाही. नागरिक घरातून बाहेर पडणार नाहीत. जेणे करून नागरिक सुरक्षित राहतील. शासन, प्रशासनाला मदत होऊन लॉकडाऊन चे पालन करता येईल. सेवेसाठी डॉ.रईस बागवान – ९२७०५८३४०९, डॉ.संजय पाटील – ९८९०६०८५०५, डॉ.घनश्याम पाटील – ९८६०९०२७६५, डॉ.अमोल भोसले – ९६२३०८४०७९, डॉ.जितेंद्र पाटील- ९४२३०२२०१८ यांचेशी दिलेल्या नंबरवर संपर्क करावा असे कळविण्यात आले आहे.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!