श्रीमती भानूबेन बाबूलाल शहा गोशाळेस गरिबांना अन्नदानासाठी कु.चार्वी ने गल्ल्यात जमवलेले ५५०० रुपये मदत देत केला वाढदिवस साजरा

अमळनेर : येथील पिंपळे रोड परिसरातील रहिवासी यतीन पवार यांची मुलगी कु.चार्वी हिने स्वतः गल्यात जमवलेले ५ हजार ५०० रुपये कोरोना साथीत श्रीमती भानूबेन गोशाळे मार्फत गोरगरिबांना सुरू असलेल्या अन्नदानासाठी मदत देत आपला वाढदिवस साजरा केला.

शहरात गोरगरिबांना सुरू असलेल्या अन्नदानाच्या कार्याबद्दल आजोबा प्रा.अशोक पवार यांचेकडून कु.चार्वी रोज ऐकत होती. या परिस्थितीची जाण ठेेेवत तिने स्वतःचा वाढदिवस हा आपल्या गल्यात जमवलेल्या रकमेतून श्रीमती भानूबेन बाबूलाल शहा गोशाळेस गरिबांच्या अन्नदानासाठी ५५०० रुपये मदत देत साजरा केला. बालवयातच तिच्या ठायी असलेल्या संवेदनशील मनाचा परिचय या दातृत्वातून करून दिला. यावेळी तिचे वडील यतीन पवार, गोशाळेचे संचालक चेतन शहा, आजोबा प्रा.अशोक पवार, संदीप घोरपडे व सहकारी कार्यकर्ते यांनी चार्वी च्या दातृत्वाचे कौतुक करून तिला आशीर्वाद दिलेत. आमदार अनिल पाटील यांनीही तिच्या या सामाजिक दातृत्वाचे कौतुक केले आहे.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!