जळगाव जिल्हा बँक संचालिका सौ. तिलोत्तमा पाटील यांचे गावकऱ्यांना कळकळीचे आवाहन

अमळनेेर : शहरात कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत असतांनाच ग्रामीण भागातही शिरकाव होण्यास सुरुवात झाली आहे. तालुक्यातील शिरुड येथे काल कोरोना पाॅझिटीव्ह रुग्ण आढळून आल्याने अमळनेर नगर परिषदेच्या माध्यमातून मा.आ.साहेबराव पाटील व नगराध्यक्षा सौ. पुष्पलता ताई पाटील यांच्या सहकार्याने जळगाव जिल्हा बँक संचालिका सौ. तिलोत्तमा पाटील यांनी संपूर्ण शिरुड गावात नगर परिषदेच्या कर्मचार्यांकडून सॅनीटायझर फवारणी करुन घेतली. यावेळी सौ. तिलोत्तमा पाटील, रविंद्र पाटील, शिरुड गावचे सरपंच सुपडु पाटील, ग्रामसेवक सूर्यवंशी भाऊसाहेब, वैद्यकीय अधिकारी डॉ. रनाळकर, वैद्यकीय सेविका, अंगणवाडी सेविका व ग्रामस्थांचे सहकार्य लाभले. कोरोना पाॅझिटीव्ह रुग्ण आढळून आल्यानंतर नगर परिषदेने तत्काळ सॅनीटायझर फवारणी केल्याने सर्व ग्रामस्थांनी आभार व्यक्त केले.
गावकऱ्यांना कळकळीचे आवाहन…
कोरोना पाॅझिटीव्ह रुग्ण आढळून आल्याने गावातील नागरिकांत भितीचे वातावरण आहे. या पार्श्र्वभूमीवर सौ. तिलोत्तमा पाटील यांनी कोरोना पाॅझिटीव्ह रुग्णाचे संपर्कात आलेल्यांनी स्वत:हून पुढे यावे, ‘कोणीही घाबरुन न जाता घरातच सुरक्षित राहावे, शासनाचे निर्देश पाळावेत’ असे कळकळीचे आवाहन गावकऱ्यांना केले आहे.