जळगाव जिल्ह्यात काल ११४ नवीन कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण

अमळनेर तालुक्यात ३९ रुग्ण वाढले, दोनशे आकडा पार…!

अमळनेर : जळगाव जिल्ह्यात काल ११४ नवीन रूग्ण आढळून आले असून जिल्ह्यातील कोरोना बाधित रूग्णांची संख्या आता १३९५ इतकी झाली आहे. यात अमळनेर, पारोळा, जामनेर, जळगाव व भुसावळ येथील रूग्ण सर्वाधीक आहेत. काल सलग दुसर्‍या दिवशी शंभर पेक्षा जास्त कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण आढळून आल्याने प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. यात अमळनेर ३९, पारोळा २१, भुसावळ १६, जामनेर ११, जळगाव शहर ९, धरणगाव ३, यावल ५, एरंडोल ५, जळगाव ग्रामीण ४ व बोदवड १ याप्रमाणे रूग्णांचा समावेश आहे.

सुरुवातीच्या काळात अमळनेरात जास्त रूग्ण आढळून आले असले तरी मध्यंतरी येथील संख्या कमी झाली होती. तथापि, गत काही दिवसांपासून येथील बाधितांची संख्या लक्षणीयरित्या वाढत असल्याचे दिसून आले आहे. यात अमळनेर तालुक्यात नवीन ३९ रूग्ण तर तालुक्याच्या सीमेलगत असलेल्या पारोळा तालुक्यातही २१ रुग्ण आढळून आले आहेत. आता काही दिवसांपासून तालुक्यातील शहापूर, कावपिंप्री या ग्रामीण भागातही कोरोनाचा शिरकाव झाला असून संसर्ग वाढत असल्याचे चित्र कालच्या आकडेवारीतून दिसून आले आहे. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी जनतेने शासन निर्देशाचे पालन करुन प्रशासनाला सहकार्य करण्याची गरज आहे.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!