
अमळनेर : विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, रि.पा.ई.(कवाडे गट), शेतकरी कामगार पक्ष, स्वाभिमानी संघटना, समाजवादी पक्ष, मित्रपक्ष महाआघाडीचे अधिकृत उमेदवार अनिल पाटील यांच्या प्रचारार्थ जिल्हा बँकेच्या संचालिका तिलोत्तमा पाटील यांच्या नेतृत्वाखाली महिलांनी आघाडी घेतली आहे. राष्ट्रवादी पक्षासोबत एकनिष्ठ असलेल्या तिलोत्तमा पाटील विजयश्री खेचून आणण्यासाठी मोठी मेहनत घेत आहेत. तालुक्यातील पाचही जिल्हा परिषद गटातील मतदारांशी संपर्क साधत आहेत.
शहरातील विविध भागात घरोघरी जाऊन प्रचार सुरु आहे. ढेकूरोड परिसरातील गुलमोहर कॉलनी, रेऊ नगर, सहकार नगर, जिजाऊ नगर, लक्ष्मीनगर, कृषी नगर, सदगुरू नगर, तलाठी कॉलनी, दीपक नगर, वामन नगर, मंदोदराबाई नगर आदी वसाहतीत घरोघरी भेटून प्रचार केला. भुमीपुत्रासाठी प्रचारावेळी जनतेची साथ मिळत आहे. प्रचारासाठी सोबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा परिषद सदस्या जयश्री पाटील, महिला प्रदेश सचिव रिता बाविस्कर, रंजना देशमुख, आशा चावरीया, अलका पवार, राजश्री पाटील, शोभा पाटील, मीनल बडगुजर, सिंधुबाई महाजन, अंजनाबाई पाटील, सारिका पाटील, स्मिता पाटील, ज्योती पाटील, चंद्रकला पाटील, सरला महाजन, रजूबाई पाटील, सुनंदा ठाकरे, शोभा ठाकरे, सरला पाटील, संगीता सुतार, कविता पाटील, रत्नाबाई पाटील, भारती पाटील, मनीषा पाटील, हिराबाई पाटील, सीमा पाटील, वैशाली पाटील, मंगल पाटील, मालती पाटील, सुषमा पाटील, सुनीता पाटील, कल्पना पाटील आदींचा समावेश होता.