नवे चेअरमनपदी प्रदीप अग्रवाल तर व्हा. चेअरमन पदी दिपक साळी यांची बिनविरोध निवड
अमळनेर : येथील अर्बन को ऑप. बँकेच्या चेअरमन, व्हा. चेअरमन पदाचा एक वर्षाचा कार्य कालावधी संपल्याने काल ता.२९ जून रोजी सहाय्यक निबंधक गुलाब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बँकेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक होवून नवीन चेअरमन व व्हा. चेअरमन पदावरील व्यक्ती ची निवड करण्यात आली. यात, नव्या चेहऱ्यांना संधी मिळाली असून नूतन चेअरमन पदी प्रदीप कुंदनलाल अग्रवाल तर व्हा. चेअरमन पदी दिपक छबुलाल साळी यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. साहजिकच अमळनेर अर्बन को ऑप. बँकेची धुरा आता नवे चेहरे सांभाळणार आहेत.
मावळते चेअरमन पंकज मुंदडा व व्हा. चेअरमन प्रवीण जैन यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने ही निवड झाली. चेअरमन प्रदीप अग्रवाल यांचे नाव लालचंद सैनानी यांनी सुचविले त्यास अभिषेक पाटील यांनी अनुमोदन दिले. व्हा. चेअरमन दिपक साळी यांचे नाव मोहन सातपुते यांनी सुचविले त्यास शांताराम ठाकूर यांनी अनुमोदन दिले. निवड प्रक्रिया पार पडल्यानंतर सहाय्यक निबंधक गुलाब पाटील यांनी निवड जाहीर केली. यावेळी मावळते चेअरमन पंकज मुंदडा, व्हा. चेअरमन प्रवीण जैन, संचालक पंडीत चौधरी, लालचंद सैनानी, मोहन सातपुते, प्रवीण पाटील, शांताराम ठाकूर, भरत ललवाणी, अभिषेक पाटील, सौ.वसुंधरा लांडगे, सौ.मीराबाई निकम, तज्ज्ञ संचालक ॲड. रमाकांत माळी, बँकेचे व्यवस्थापक अमृत पाटील आदी उपस्थित होते. निवडीवेळी कुंदनलाल अग्रवाल, विनोदभैय्या पाटील, प्रवीण साहेबराव पाटील, अजय केले आदी मान्यवरांनी उपस्थिती दिली. निवडीनंतर नूतन चेअरमन प्रदीप अग्रवाल, व्हा. चेअरमन दिपक साळी यांचा सत्कार करण्यात आला. दिव्यचक्र परिवारातर्फे अभिनंदन व भावी वाटचालीस शुभेच्छा..!