अमळनेर रोटरी क्लबचा पदग्रहण समारंभ; सन २०२०-२१ वर्षासाठी नवी कार्यकारिणी जाहीर

प्रेसिंडेंट पदी रो. अभिजित सुभाष भांडारकर तर ऑ.सेक्रेटरी पदी रो. महेश पाटील

अमळनेर : येथील रोटरी क्लबची दि.२८ जून रोजी सोशल डिस्टन्सींग पाळत मोजक्या सभासदांच्या उपस्थितीत सभा पार पडली. या सभेत सन २०२०-२१ या वर्षासाठी अमळनेर रोटरी क्लबची २८ जणांची नवी कार्यकारिणी जाहीर करुन पदग्रहण समारंभ पार पडला. प्रेसिंडेंट पदी रो. अभिजित सुभाष भांडारकर तर ऑ.सेक्रेटरी पदी रो. महेश पाटील यांची निवड करण्यात आली. नव्या निवडीनुसार, प्रेसिंडेंट पदाचा पदभार रो. अभिजित भांडारकर यांना सन २०१९-२० चे मावळते प्रेसिंडेंट रो.पुनम कोचर यांनी तसेच ऑ.सेक्रेटरी पदाचा पदभार रो. महेश पाटील यांना मावळते ऑ.सेक्रेटरी रो.वृषभ पारेख यांनी सोपविला. 

सभेत सन २०२०-२१ या वर्षासाठी रोटरी डिस्ट्रिक्ट ३०३० च्या कार्यकारिणीसाठी अमळनेर रोटरी क्लब च्या १३ मेंबर्सची नियुक्ती झाली. यावेळी “सेवाचक्र” क्लब बुलेटीनचे व क्लबच्या लोगोचे प्रकाशन करण्यात आले. तसेच डिस्ट्रीक्ट गव्हर्नर रो. शब्बीर शाकिर, असि. डिस्ट्रीक्ट गव्हर्नर रो. पुनम गुजराथी, कार्यक्रमाचे मुख्य अतिथी रो. राजे सग्रामसिंग भोसले यांनी पाठविलेले शुभेच्छा व्हिडीओ संदेश दाखविण्यात आले. कोरोना महामारीच्या काळात देखील परिस्थितीचा अंदाज व समाजाची गरज ओळखून अमळनेर रोटरी क्लबने मास्क, सॅनिटायझर वाटप, स्वॅब घेण्यासाठी केबीन, कोव्हीड बाबतची जनजागृती मोहीम, गरजूंना अन्न पोहचविणे, एडस् बाधित कुटूंबाना शिधा वाटप, पी.एम.फंडला भरघोस निधी अशी बरीच सामाजिक कार्य केलीत. मागील वर्षात मुडी, पातोंडे येथे मोफत मेडीकल कॅम्प, गरजूंना कपडे वाटप असे विविध उपक्रम राबवले. यापुढेही असेच विविध समाज उपयोगी उपक्रम सुरू ठेवण्याचा मानस प्रेसिंडेंट रो.अभिजित भांडारकर यांनी त्यांच्या मनोगतात व्यक्त केला. यावेळी रोटरी क्लब कार्यकारिणी व डिस्ट्रिक्ट कार्यकारिणीत निवड झालेल्या सदस्यांचे स्वागत करण्यात आले. आभार प्रदर्शन मा.सेक्रेटरी रो.वृषभ पारेख यांनी केले.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!