
अमळनेर : शहरातील न्यू प्लाॅट भागातील शिवाजी उद्यानाजवळील रहिवासी शिवसेना शाखाप्रमुख जगदीश शामकांत आठवले यांचे काल सकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. मृत्यू समयी ते ४६ वर्षांचे होते. त्यांचे अमळनेर बसस्थानक समोर पुष्कराज हाॅटेल होते. ते पोलीस मित्र होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, मुली, भाऊ असा परिवार आहे. ते कमल भोजनालय चे कृष्णकांत आठवले यांचे चुलत बंधू होत.