
जळगाव : महाराष्ट्रात कोरोना विषाणूच्या प्रभावाच्या पार्श्वभूमीवर राज्य सामाईक प्रवेश परिक्षा कक्ष, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांनी त्यांचेमार्फत दिनांक ४ जुलै २०२० ते ५ ऑगस्ट २०२० या कालावधीत घेण्यात येणारी एमएचटी-सीईटी २०२० ही परिक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. कोरोनाची परिस्थिती आणि विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि स्वास्थ रक्षणाच्या दृष्टीकोनातून सदर परिक्षेची पुढील तारीख जाहीर करण्यात येईल. असे एमएचटी-सीईटी २०२० चे केंद्रप्रमुख तथा निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.