अमळनेर डाक विभागातील वरिष्ठ अधिकारीही कोरोना पाॅझिटीव्ह; सोमवारपासून तीन दिवस डाक कार्यालय बंद

अमळनेर : जळगाव जिल्ह्यात आज रविवारी २५४ बाधीत रुग्ण आढळले असून त्याबाबत जिल्हा प्रशासनाला सायंकाळी अहवाल प्राप्त झाला आहे. जिल्ह्यातील बाधीतांची संख्या तब्बल ४४३० वर पोहोचली असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.
बाधीतांमध्ये जळगाव शहर ६४, जळगाव ग्रामीण ०३, भुसावळ ०८, अमळनेर १५, चोपडा २३, पाचोरा ०४, भडगाव ००, धरणगाव ०६, यावल २५, एरंडोल १३, जामनेर ०२, रावेर २२, पारोळा ०३, चाळीसगाव १९, मुक्ताईनगर २१, बोदवड २४, अन्य ०२ याप्रमाणे समावेेश आहे.
अमळनेर तालुक्यात आज ८१ निगेटिव्ह
अमळनेर तालुक्यात संपर्कातील ९ तर नवीन ५ बाधित रुग्णांचा समावेश आहे. यात, अयोध्या नगर १, न्यू प्लाॅट १, बहादरवाडी ४, मंगरूळ २, जानवे १ हे संपर्कातील बाधित आहेत. ब्रम्हे गल्ली १, शारदा कॉलनी १, फरशी रोड १, गुलमोहर काॅलनी १, मंगलादेवी चौक १ हे नवीन बाधित रुग्ण आहेत. अमळनेर डाक विभागातील एक वरिष्ठ अधिकारी कोरोना पाॅझिटीव्ह आढळून आल्याने खबरदारी म्हणून कार्यालयातील कर्मचाऱ्यांचे स्वॅब घेतले जाणार आहेत. सोमवार, ता.६ पासून तीन दिवस डाक कार्यालय बंद राहणार असून कोणीही गर्दी न करण्याचे आवाहन प्रभारी पोस्ट मास्तर रमेश पवार यांनी केले आहे. तालुक्यात एकूण ३९५ ॲक्टिव्ह, कोरोनामुक्त २६९, आज स्वॅब घेतलेले ९३, प्रलंबित रिपोर्ट १३५, उपचार घेत असलेले ६२ रुग्ण आहेत.
