पुरातत्व विभागाच्या सहाय्यक संचालक आरती आळे यांनी दगडी दरवाजाची केली प्रत्यक्ष पाहणी

नगरपालिकेने दरवाजा ताब्यात घेऊन त्याचे नूतनीकरण व सुशोभीकरण करण्याबाबत दिल्या सूचना

अमळनेर : येथील दगडी दरवाजालगत झालेला अरुंद रस्ता, जीर्णावस्था पाहता तातडीने दुरुस्तीची खरोखर गरज असल्याने ताबडतोब प्रस्ताव पाठवून नगरपालिकेने हा दरवाजा ताब्यात घेऊन त्याचे नूतनीकरण व सुशोभीकरण करावे अशा सूचना पुरातत्व विभागाच्या सहाय्यक संचालक आरती आळे यांनी आमदार अनिल पाटील यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत दिल्या. नुकतीच त्यांनी प्रत्यक्ष दरवाजाची पाहणी माजी आमदार साहेबराव पाटील, मुख्याधिकारी डॉ.विद्या गायकवाड, पुरातत्व विभागाचे कृष्णा बालपांडे, अभियंता संजय पाटील, चेतन सोनार, संजय चौधरी यांच्या उपस्थितीत केली.

दगडी दरवाजा जीर्ण झाल्यामुळे व बुरुज कोसळल्यामुळे वाहतुकीस अडसर ठरत आहे. दगडी दरवाजा दुरुस्तीचा विषय लवकर मार्गी लागावा म्हणून नागरिकांनी आमदार अनिल पाटील तसेच नगरपलिकेकडे मागणी लावून धरली होती. अतिशय गंभीर परिस्थिती आणि पुरातत्व विभागाची अडचण, निधीची तरतूद नाही त्यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात होता. कोणत्याही क्षणी बुरुज पूर्ण कोसळून अपघात होऊ शकतो हे लक्षात घेवून माजी आमदार साहेबराव पाटील यांनी पुढाकार घेतला. सदरील दगडी दरवाजा नगरपलिकेकडे हस्तांतर करून त्याचे जतन व सुशोभीकरणाची तयारी दर्शविली होती. आमदार अनिल पाटील यांनी सांस्कृतिक मंत्रालयात पाठपुरावा करून संगोपन योजनेंतर्गत १० वर्षांसाठी नगरपलिकेकडे दरवाजा सोपवण्याची परवानगी मिळवली. त्याचे पत्र आणि प्रत्यक्ष दरवाजाची पाहणी सहाय्यक संचालक आरती आळे यांनी माजी आमदार साहेबराव पाटील व संबंधित अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत केली.

दरवाजालगत झालेला अरुंद रस्ता, जीर्णावस्था पाहून त्यांनी तातडीने दुरुस्तीची गरज असल्याचे सांगितले. दरवाजाला पूर्वीसारखा मजबूत करून त्याच्या सौंदर्यात भर पाडावी आणि वाहतूक सुरक्षित करून अनर्थ टाळावेत यासाठी लगेच प्रस्तावाची मागणी करीत मुख्याधिकारींनी तसा करारनामा करून घ्यावा असेही सांगितले. त्यांनंतर आमदार पाटील यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत कोरोनामुळे शासनाकडून आर्थिक तरतूद होणे शक्य नसल्याबाबत चर्चा झाली. यामुळे पालिकेच्या माध्यमातून तातडीने हे काम करणे उचित होईल असे ठरले. यावेळी जिल्हा परिषद सदस्या जयश्री पाटील, एल. टी. पाटील हजर होते.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!