निवासी हॉटेल्स, लॉज ८ जुलैपासून उघडणार; नियमांचे पालन करावे लागणार

‘मिशन बिगीन अगेन’ अंतर्गत राज्य सरकारचा निर्णय

मुंबई : ‘मिशन बिगीन अगेन’तर अंतर्गत राज्यात गेल्या तीन महिन्यांपेक्षा जास्त काळ बंद असलेली निवासी हॉटेल्स, लॉज ८ जुलैपासून उघडणार आहेत. राहण्याची व्यवस्था असलेली हॉटेल्स, लॉज कंटेनमेंट झोन वगळता उघडण्याचा निर्णय राज्य सरकारने नुकताच घेतला आहे. ‘मिशन बिगीन अगेन’ अंतर्गत हा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी हॉटेल्स, लॉज चालकांना नियमांचे पालन करावे लागणार आहे.

राज्य सरकारने कंटेनमेंट झोन वगळता राहण्याची क्षमता असलेल्या हॉटेलची जी क्षमता आहे त्याच्या ३३ टक्के ग्राहकांना राहण्याची संमती दिली आहे. हॉटेलमध्ये स्टाफ व ग्राहकांनाच आत ये जा करण्यास परवानगी असेल. रेस्तराँमध्येही फक्त राहण्यासाठी संमती देण्यात आलेली आहे. ज्यावेळी ग्राहक येतील तेव्हा थर्मोमीटरने तापमान पाहणं गरजेचं आहे. रिसेप्शन टेबलवर स्क्रिनिंग करणं सक्तीचं असणार आहे. सॅनेटायझरचा वापर हा सक्तीसाठी करण्यात आला आहे. हॉटेल्स आणि रेस्तराँमध्ये असलेले गेमिंग झोन, स्विमिंग पूल, जिम हे बंदच राहणार आहेत. जे ग्राहक हॉटेल्समध्ये राहण्यासाठी येतील त्यांना मास्क वापरणं, आरोग्य सेतु ॲप असणं अनिवार्य असणार आहे. ए.सी. चे तापमान २५ ते ३० डिग्री इतके असावे. हॉटेल्समध्ये गर्दी न होऊ देण्याची जबाबदारी हॉटेल चालकांची असणार आहे. थर्मल स्क्रिनिंगची व्यवस्था, हँड सॅनेटायझरची मोफत व्यवस्था करणं आवश्यक आहे. गेस्ट रुम, सार्वजनिक ठिकाण आणि लॉबी या ठिकाणीही सॅनेटायझर ठेवणं आवश्यक आहे. ग्लोव्ज, फेस मास्क वापरणं बंधनकारक असेल. QR कोड, ऑनलाइन फॉर्म्स, डिजिटल पेमेंट्स जसं ई वॉलेट वगैरे.. हे सगळं हॉटेल्सनी सुरु करावं. असेही निर्देश देण्यात आले आहेत.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!