लॉकडाऊनचे पहिल्याच दिवशी नियम मोडून शहरात विनाकारण फिरणाऱ्या ९७ लोकांवर गुन्हा दाखल

अमळनेर : जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आदेशानुसार कोरोना संसर्ग रोखण्यासाठी अमळनेर येथे ७ ते १३ जुलै या काळात लॉकडाऊनचे निर्देश देण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी यांचे आदेशान्वये शहरात कडक लॉकडाऊन पाळण्यात येत आहे.

लॉकडाऊनचे पहिल्याच दिवशी ता.७ रोजी नियम मोडून शहरात विनाकारण फिरणाऱ्या ९७ लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून ३५ हजार रुपये दंड आकारण्यात आला. यात विनापरवाना, मास्क न लावता वावरणे अशा लोकांवर कारवाई करण्यात आली. सदर कार्यवाही अतिरिक्त पोलीस अधिक्षक सचिन गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अंबादास मोरे व त्यांचे पथक स.पो.नि. प्रकाश सदगीर, स.पो.नि. एकनाथ ढोबळे, पो.उप निरीक्षक गणेश सूर्यवंशी व राहुल लबडे तसेच कर्मचारी पो.नाईक डॉ.शरद पाटील, पो.हवालदार संजय पाटील, पो.नाईक दिपक माळी, रवी पाटील, हितेश चिंचोरे, ललित पाटील, अमळनेर बस डेपोचे ड्रायव्हर किरण धनगर यांनी केली.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!