
अमळनेर : येथील कु.मानसी साळुंके हिची deliotte US ह्या आंतरराष्ट्रीय वित्त कंपनीत कर सल्लागार पदी नियुक्ती झाली आहे. कु.मानसी ने MET management कॉलेज मधून MBA in finance केले असून पुणे विद्यापीठातुन वाणिज्य ची पदवी प्राप्त केली आहे. साने गुरुजी विद्यालय, अमळनेर येथे तिचे माध्यमिक शिक्षण झाले असून प्रताप महाविद्यालय,अमळनेर येथे १२ वी पर्यंत चे शिक्षण घेतले आहे. ती उत्तम नृत्यांगना असून क्लासिकल आणि इतर नृत्य प्रकारात पारंगत आहे. तिला जर्मन भाषा ही अवगत असून ती दूरदर्शन वरील ‘दम दमा दम’ ह्या नृत्य मालिकेत अमळनेर शहरातून कला सादर करणारी प्रथम नृत्यांगना होती. Deloitte ही आंतरराष्ट्रीय कन्सलटिंग फर्म असून जगात टॉप पाच टॅक्स कॅन्सलटिंग कंपनीत एक आहे. तिच्या या निवडीबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे. महिला पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्त्या प्रा.जयश्री साळुंके आणि रेल्वे विभागातील राजेंद्र साळुंके यांची ती कन्या आहे. दिव्यचक्र परिवारातर्फे अभिनंदन व शुभेच्छा..!