एरंडोल येथे साकारले परीट धोबी समाजाचे टुमदार सामाजिक सभागृह

माजी मंत्री व आमदार डॉ.सतिष भास्करराव पाटील यांच्या स्थानिक विकास कार्यक्रम निधीतून उभारणी

जळगाव : जिल्ह्यातील एरंडोल येथे परीट-धोबी समाजाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांची एकवाक्यता, जिद्द आणि निरंतर पाठपुराव्यातुन समाजाचे टुमदार सभागृह उभे राहिले आहे. एरंडोल तालुका परिट (धोबी) समाज हॉलसाठी नगरपालिका क्षेत्रातील खुला भूखंड १४५/२ या जागेवर स्थानिक विकास कार्यक्रमातून माजी मंत्री व तत्कालीन आ.डॉ.सतिष पाटील यांनी निधी दिला होता. यातून परीट धोबी समाज सभागृहासाठी सर्वस्तरीय पाठपुरावा करून एरंडोल येथे सुसज्ज सभागृह साकारले गेले आहे.

समाजाचे ज्येष्ठ नेते माजी नगराध्यक्ष किशोरभाऊ निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली रविंद्र निंबाळकर एरंडोल परिट (धोबी) समाज तालुकाध्यक्ष श्याम बाबूलाल जाधव, शहराध्यक्ष चेतन महाले आणि एरंडोल परिट (धोबी) समाज बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष योगेश वाघ, उपाध्यक्ष प्रदीप सूर्यवंशी, नितीन तेलंगे, आबा महाले, समाधान शिरसाळे, अजय महाले, पवन शिरसाळे, अमोल शिरसाळे आदी पदाधिकऱ्यांनी या सामाजिक सभागृहासाठी मेहनत व सातत्यपूर्ण पाठपुरावा केल्याने हे काम उभे राहिले. एरंडोल शहरात समाजाचे हे काम होण्यासाठी राजेंद्र शिंदे सर यांची स्थानिक आमदार डॉ.सतिष पाटील यांच्याकडे आग्रही भूमिका होती.

पुढील टप्प्यात सुशोभीकरण करण्याचा मानस…
सामाजिक हॉलपुढे आता डोम उभारणे, जागेला संरक्षक भिंत व मोकळ्या जागेवर पेव्हर ब्लॉक असे विविध कामे करून सभागृहाबाहेर सुशोभीकरण होण्यासाठी आ.चिमणराव पाटील, खासदार उन्मेष पाटील व विधानपरिषद सदस्य चंदूलाल पाटील यांच्यासह १५ व्या वित्त आयोगातून एरंडोल नगरपालिका प्रशासनाकडे स्थानिक पदाधिकाऱ्यांना पाठपुरावा करायला लावून ही कामे सुद्धा पूर्ण करण्याचा मानस व्यक्त करून समाजाचे मा. प्रदेशाध्यक्ष विवेक ठाकरे यांनी स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या जिद्दीचे कौतुक केले आहे.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!