तालुक्यातील शेतकऱ्यांना कापसाचा पीकविमा मंजूर; शेतकऱ्यांना दिलासा

आमदार अनिल पाटील यांच्या सततच्या पाठपुराव्याला यश

अमळनेर : तालुक्यातील शेतकऱ्यांना पीकविमा मिळावा यासाठी आमदार अनिल पाटील यांनी शासन दरबारी प्रश्न लावून धरला होता. उपमुख्यमंत्री अजित दादा पवार आणि कृषी मंत्री दादा भुसे यांनी चर्चा करून सतत उपेक्षित असणाऱ्या तालुक्यातील शेतकऱ्यांना आता कापसाचा पीकविमा मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. कापूस पीकविमा मंजूर झाल्याची माहिती आमदार अनिल पाटील यांनी दिली आहे.

जुलै महिन्यात व ऑगस्ट महिन्यात अतिवृष्टी व अवकाळी पाऊस झाला. यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला होता सतत चार वर्षे दुष्काळ असूनही विमा मिळाला नसल्याने आमदार झाल्यानंतर अनिल पाटील यांनी महसूल व कृषी अधिकाऱ्यांकडून शेतकऱ्यांच्या थेट बांधावर जाऊन शेत पंचनामे करून त्याचे प्रस्ताव तातडीने शासन दरबारी पोहचवण्यासाठी प्रयत्न केले. अमळनेर तालुक्यातील शेतकऱ्यांना पीकविमा मंजूर करण्यात यावा अशी आग्रही मागणी जोरदारपणे लावून धरली होती. शासन दरबारी याबाबत चर्चा व पाठपुरावा सुरू होता. सरकार स्थापनेनंतर कोरोना मानगुटीवर बसल्याने हा प्रश्न लांबणीवर पडला होता. नुकसान होऊनही पीकविमा मिळत नसल्याने शेतकरी आमदार पाटील यांचेकडे तगादा लावत होते. कोरोना परिस्थिती व लॉकडाऊन काळात प्रशासन व शासन यांचे लक्ष कोरोनाकडे असल्याने मूळ प्रश्न सुटत नव्हते. अखेर आमदार पाटील यांनी अजित दादा पवार व कृषी मंत्री दादा भुसे यांच्याकडे पाठपुरावा व चर्चा करून पीकविमा बाबत आग्रह धरला होता. आता सततच्या पाठपुराव्याला यश आले आहे.

तालुक्यातील शेतकऱ्यांनी जुलै २०१९ मध्ये हेक्टरी १८०० रुपये भरले होते तालुक्यातील २५ हजार कापूस उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी २० ते २३ हजार रु प्रमाणे पीक विमा मंजूर झाला आहे. तालुक्यातील ८ मंडळात शिरूड, वावडे, भरवस, मारवड, अमळगाव, पातोंडा, नगाव, अमळनेर या आठही मंडळातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. याबद्दल सर्व शेतकऱ्यांनी आमदार अनिल पाटील, तहसीलदार मिलिंद वाघ, तालुका कृषी अधिकारी भरत वारे, पंचायत समिती गटविकास अधिकारी संदीप वायाळ यांचे आभार व्यक्त केले आहेत.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!