जिल्ह्यात आज ३०० ची सीमा पार; दिवसभरात सहा कोरोनाबाधीतांचा मृत्यू

जळगाव : जिल्ह्यात आज नव्याने ३१६ कोरोनाबाधित रूग्ण आढळून आले आहेत. आजपर्यंत एकूण कोरोनाबाधीतांची संख्या ६९७० इतकी झाली असून ४२३५ रुग्ण बरे झाले आहेत. आज दिवसभरात जिल्ह्यात ६ कोरोनाबाधीत रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यात नव्याने आढळलेल्या रूग्णांमध्ये जळगाव शहर ९३, जळगाव ग्रामीण २०, भुसावळ ४४, अमळनेर १५, चोपडा ८, पाचोरा ६, भडगाव २, धरणगाव १४, यावल ४, एरंडोल २६, जामनेर १७, रावेर २३, पारोळा ३, चाळीसगाव १५, मुक्ताईनगर २५, बोदवड १ याप्रमाणे बाधित रूग्ण आहेत. कोरोनामुळे दिवसभरात जामनेर तालुक्यातील २, जळगाव शहर, जळगाव ग्रामीण, भडगाव व अमळनेर तालुक्यातील प्रत्येकी एका रूग्णाचा अशा ६ बाधीत रुग्णांचा मृत्यू झाला आहे अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागोराव चव्हाण यांनी दिली.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!