जय योगेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा बारावीचा दोन्ही शाखेचा एकूण निकाल ९१.८० टक्के

सायन्स शाखेतून कु.योगेश्वरी महाले तर आर्टस् शाखेतून आर्यन मोरे प्रथम

अमळनेर : येथील जय योगेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा सायन्स व आर्टस् चा निकाल ९१.८० टक्के लागला आहे. सायन्स शाखेचा ९१.४८ टक्के व आर्टस् शाखेचा ९२.५८ टक्के निकाल लागला आहे.

सायन्स शाखेतून प्रथम कु.योगेश्वरी संतोष महाले ८२.१५ ,द्वितीय दिग्विजय सकतसिंग गिरासे ७६.६१, तृतीय रायमा संजयकुमार अग्रवाल ७५.५३ तर आर्टस् शाखेतून प्रथम आर्यन संजय मोरे ७६.९२, द्वितीय अमिषा कैलास सांगिले ७२.९२, तृतीय राहूल उत्तम पवार ७२.७६ असे गुण मिळवून उत्तीर्ण झाले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे चेअरमन व.ता.पाटील व धनदाई एज्यु सोसायटीचे अध्यक्ष डी .डी .पाटील, संचालक मंडळ तसेच शाळेचे प्राचार्य, पर्यवेक्षक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी हार्दिक अभिनंदन केले आहे.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!