कु.अश्विनी पवार प्रथम, कु.मोनाली मिस्तरी द्वितीय तर कु.देवयानी बोरसे विद्यालयात तृतीय

अमळनेेर : तालुक्यातील अमळगाव येथील आदर्श माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयाचा बारावी परिक्षेचा निकाल नुकताच घोषित झाला. या निकालात कला शाखेचा ८२.७२% निकाल लागला असून किमान कौशल्य विभागाचा निकाल ९०.९०% लागला आहे. सालाबादाप्रमाणे विद्यालयात बारावीच्या निकालात मुलींनी बाजी मारली आहे.
खेडी येथील परंपरा कायम राखत कु.अश्विनी संजय पवार हिने ४९९ (७६.७६%) गुण प्राप्त करत विद्यालयात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाली आहे. निंभोरा येथील कु.मोनाली पितांबर मिस्तरी हीने ४९४ (७६%) गुण प्राप्त करत द्वितीय तर अमळगाव येथील कु.देवयानी पंडित बोरसे हीने ४८० (७३.८४%) गुण प्राप्त करत विद्यालयात तृतीय क्रमांक पटकावला आहे. कु.अश्विनीच्या यशाचे खेडी गावात तिचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. पुढील काळात ती स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणार असून प्रशासकीय सेवेमध्ये जाण्याचा तिचा मानस आहे. तिच्या यशामागे कुटुंब, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांचा वाटा असल्याचे ती सांगते. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे विद्यालयाचे प्राचार्य प्रा.पी.ए.पाटील, सर्व प्राध्यापक व शिक्षक यांनी अभिनंदन केले आहे.
