प्रताप मिल कम्पाऊंड मधील डांबरीकरण करण्यात आलेल्या रस्त्यांचे कृषीभूषण साहेबराव पाटील यांच्या हस्ते लोकार्पण

अमळनेर : येथील प्रताप मिल कम्पाऊंड मधील डांबरीकरण करण्यात आलेल्या रस्त्यांचे लोकार्पण माजी आमदार कृषीभूषण साहेबराव पाटील यांच्या हस्ते आज पार पडले. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे दलित वस्ती सुधार योजनेंतर्गत रस्त्यांचे डांबरीकरण करण्यात आले. परिसरातील या रस्त्यांच्या पुर्णत्वासाठी कामगार तथा दलित नेते कालकथित रामभाऊ संदानशिव, कृषीभूषण साहेबराव पाटील, वार्डचे नगरसेवक मनोज पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले.

सदर लोकार्पण कार्यक्रमासाठी कृषीभूषण साहेबराव पाटील, नगरसेवक मनोज पाटील, नगरसेवक विवेक पाटील, नगरसेवक श्याम पाटील, नगरसेवक बाबु साळुंखे, परिसरातील रहिवासी प्रा.राजेन्द्र पाटील, डॉ.विजय तुंटे, किशोर पाटील, डॉ.हर्षवर्धन जाधव, आर.पी.जैन, विजय कटारिया, आनंदा रोकडे, डॉ.राहुल निकम, ठाकरे सर, विजय पाटील, प्रा.भानुदास गुलाले आदी उपास्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवर व पत्रकारांचा स्थानिक रहिवाश्यांकडून सत्कार करण्यात आला.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!